स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिद संघाने ला लीग फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ विसावा विजय नोंदविला. त्यांनी अल्मेरियाचा ४-१ असा सहज पराभव केला.
रिअल माद्रिदचे इस्को व गॅरेथ बॅले यांनी पूर्वार्धात गोल केले. प्रतिस्पर्धी संघाच्या वेर्झा याने गोल करीत ही आघाडी कमी केली. त्याने पेनल्टी किकद्वारा मारलेला फटका रिअल संघाचा गोलरक्षक इस्केर कॅसिलास याने शिताफीने अडविला अन्यथा २-२ अशी बरोबरी झाली असती. रोनाल्डो याने करीम बेंझेमा व दानी केव्र्हाजेल यांनी दिलेल्या पासवर गोल करीत संघास ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत रोनाल्डो याने आतापर्यंत २५ गोल केले आहेत.
रिअल माद्रिदचा सलग २०वा विजय
स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिद संघाने ला लीग फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ विसावा विजय नोंदविला.
First published on: 14-12-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real madrid chase 20th consecutive victory