स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिद संघाने ला लीग फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ विसावा विजय नोंदविला. त्यांनी अल्मेरियाचा ४-१ असा सहज पराभव केला.
रिअल माद्रिदचे इस्को व गॅरेथ बॅले यांनी पूर्वार्धात गोल केले. प्रतिस्पर्धी संघाच्या वेर्झा याने गोल करीत ही आघाडी कमी केली. त्याने पेनल्टी किकद्वारा मारलेला फटका रिअल संघाचा गोलरक्षक इस्केर कॅसिलास याने शिताफीने अडविला अन्यथा २-२ अशी बरोबरी झाली असती. रोनाल्डो याने करीम बेंझेमा व दानी केव्‍‌र्हाजेल यांनी दिलेल्या पासवर गोल करीत संघास ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत रोनाल्डो याने आतापर्यंत २५ गोल केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा