सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून ख्याती मिळविलेल्या गॅरथ बॅले याला पाठीचे दुखणे झाले असले तरी त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याच्या वृत्ताचा रिअल माद्रिद क्लब व्यवस्थापनाने इन्कार केला आहे.
येथील एका वृत्तपत्राने गॅरथवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे वृत्त दिले होते. त्या संदर्भात खुलासा करताना माद्रिद संघाने म्हटले आहे की, गॅरथला पाठीच्या दुखण्याचा त्रास होत आहे. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंना हा त्रास होत असतो. मात्र त्यामुळे या खेळाडूंना स्पर्धामध्ये भाग घेताना कधीही तंदुरुस्तीची समस्या जाणवत नसते.
गॅरथ हा सध्या स्पेनमध्येच विशेष सराव शिबिरात सहभागी झाला आहे.जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत मलागा संघाविरुद्ध वेल्स संघाचा शनिवारी सामना होणार आहे. या सामन्यात वेल्स संघाकडून त्याचा सहभाग अद्याप अनिश्चित आहे.

Story img Loader