करिम बेंझेमाने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या बळावर रिआल माद्रिद क्लबने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये ग्रॅनाडावर १-० असा विजय साजरा करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. अॅटलेटिको माद्रिदनेही आगेकूच केली.
ग्रॅनाडाचा शिस्तबद्ध बचाव आणि गोलरक्षक अॅण्ड्रेस फर्नाडिसची मजबूत बचावभिंत ओलांडण्यात माद्रिदला पहिल्या सत्रात अपयश आले. पहिल्या सत्रात यजमान माद्रिदने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु ग्रॅनाडाच्या बचावासमोर त्या तग धरू शकल्या नाही. दुसरीकडे युसेफ अल अरबीने केलेला गोल ऑफ साइड ठरविण्यात आल्याने ग्रॅनाडाची पूर्वार्धात आघाडी घेण्याची संधी हुकली. ५५व्या मिनिटाला करिम बेंझेमाने ग्रॅनाडाची बचावफळी भेदून माद्रिदला
१-० अशी आघाडी मिळवून दिली. बेंझेमाचा हाच गोल निर्णायक ठरला. या विजयामुळे माद्रिदच्या खात्यात दहा गुण जमा झाले असून, अॅटलेटिको आणि बार्सिलोना प्रत्येकी ९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसऱ्या सामन्यात अॅटलेटिकोनेही फर्नाडो टोरेस व अँजेल कोरिआ यांनी पहिल्या सत्रात नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर एैबारवर २-० असा विजय नोंदवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा