रिअल माद्रिद संघाने स्पॅनिश चषक फुटबॉल स्पर्धेत व्ॉलेन्सिआविरुद्धची लढत बरोबरीत सोडवत उपांत्य फेरीत आगेकूच केली. अन्य लढतींत सेव्हिलाने झारागोझाचा ४-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली.
सामना सुरू झाल्यापासून दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे इकर कॅसिलसला मैदानाबाहेर जावे लागले. हा रिअलसाठी मोठा धक्का होता. मात्र मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना करीम बेन्झेमाने गोल करत रिअलचे खाते उघडले. मध्यंतरानंतर लगेचच व्ॉलेन्सिआतर्फे टिनो कॉस्टाने गोल करत बरोबरी केली. यानंतर पुन्हा एकदा गोलसाठी जोरदार मुकाबला रंगला; परंतु लढत बरोबरीत सुटली. मात्र गुणतालिकेत पुरेसे गुण असल्याने बरोबरी होऊनही रिअलने उपांत्य फेरीतले स्थान पक्के केले.
दुसऱ्या लढतीत सेव्हिलाने झारागोझाचा ४-० असा धुव्वा उडवला.
नेग्रेडोने ३६व्या आणि ६७व्या मिनिटाला गोल केला. इव्हान राकिटीक आणि मनू डेल मोराल यांनी प्रत्येकी एक गोल करत सेव्हिलाला दिमाखदार विजय मिळवून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा