नऊ सामन्यांतील गोलचा दुष्काळ संपवून गॅरेथ बॅलेने दोन गोलसह रिअल माद्रिद संघाला ला लीगा स्पध्रेत विजयपथावर नेल़े  त्याच्या या दोन गोलच्या बळावर माद्रिदने २-० अशा फरकाने लेव्ॉन्टे संघाचा पराभव केला़  सलग तीन लढतींत विजयाची चव चाखण्यात अपयशी ठरलेल्या माद्रिदने या विजयासह स्पध्रेतील आव्हान जिवंत ठेवले आह़े  त्यांची पुढील लढत बार्सेलोनाविरुद्ध होणार आह़े १८व्या मिनिटाला बॅलेने संघाला पहिला गोल करून दिला़  ४०व्या मिनिटाला दुसऱ्या गोलची नोंद करून मध्यंतरालाच माद्रिदने २-० अशी आघाडी घेतली होती़  माद्रिदने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखून विजय संपादन केला़

Story img Loader