ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली नाराजी
झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आज पाचव्या लढतीवरही भारत विजयाची मोहोर उमटवण्याच्या निर्धाराने खेळत असताना आता, संघ निवडीवरून नवे राजकारण सुरू झाले आहे. आजच्या सामन्यातही जम्मू-काश्मिरचा अष्टपैलू खेळाडू परवेज रसूल याचा संघात समावेश न केल्याने जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.
“परवेज रसूलला खेळवयाचे नव्हते, तर झिम्बाब्वे दौऱयावर त्याला नेलेच कशाला?, ही निराशाजनक गोष्ट आहे. बीसीसीआय रसूलला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संधी द्या.” असे परवेज रसूल यांनी ट्विटरवरून विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 ओमर अब्दुल्ला यांनी केलेले ट्विट-

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Really disappointed that parvez rasool hasnt been given a game in zimbabwe omar abdullah