इंग्लिश संघाचा तो तारणहार.. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळाले.. भारताच्या गोलंदाजांवर त्याने नेहमीच हुकूमत गाजवली.. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.. गेली नऊ वर्षे इंग्लंडच्या यशात त्याने मोलाची भूमिका बजावली.. मैदानावर आणि मैदानाबाहेरील अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे तो गोत्यात आला.. अॅशेस मालिकेतील दारुण पराभवानंतर त्याची कारकीर्दही वादग्रस्त पद्धतीने संपुष्टात आली. इंग्लंडचा आगामी वेस्ट इंडिज दौरा आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचा विचार न करण्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ठरवल्यानंतर पीटरसनने आपली कारकीर्द संपुष्टात आल्याचे बुधवारी जाहीर केले.
अॅशेस मालिकेतील इंग्लंडच्या पराभवानंतर ईसीबीने संघात मोठे बदल करण्याचे ठरवले होते. इंग्लंडला यशोशिखरावर नेणारे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी राजीनामा देऊन या बदलाचे संकेत दिले होते. त्यानंतर ईसीबीने आता पीटरसनचा ‘बळी’ मिळवला. १०४ कसोटी आणि १३६ एकदिवसीय सामन्यांनंतर पीटरसनचे इंग्लिश संघाशी असलेले नऊ वर्षांचे नाते संपुष्टात आले. पीटरसनने कसोटीत ४७.२८च्या सरासरीने ८१८१ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०.७३च्या सरासरीने ४४४० धावा केल्या आहेत. ३७ ट्वेन्टी-२० सामन्यांत त्याने ११७६ धावा काढल्या आहेत.
ईसीबीने बळजबरीने पीटरसनची कारकीर्द संपुष्टात आणल्यानंतर त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. ‘‘एक क्रिकेटपटू म्हणून मी घेतलेला निवृत्तीचा निर्णय योग्यच आहे. यापुढेही मला खेळायचे होते, पण इंग्लंड संघाकडून खेळणे शक्य होणार नसल्याचा खेद होत आहे,’’ असे पीटरसनने सांगितले.
पीटरसनच्या कारकिर्दीचा वादग्रस्त पद्धतीने अस्त!
इंग्लिश संघाचा तो तारणहार.. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळाले.. भारताच्या गोलंदाजांवर त्याने नेहमीच हुकूमत गाजवली..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-02-2014 at 04:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebuilding ecb end pietersens england career