इंग्लंडमध्ये सध्या ‘टी २० ब्लास्ट लीग’ ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये काल लिसेस्टरशायर आणि डरहॅम यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात एका १७ वर्षीय लेगस्पिनरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रेहान अहमद असे या गोलंदाजाचे नाव आहे. रेहानच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लिसेस्टरशायर संघासाठी रेहानने चार षटकांत २२ धावा देत चार बळी घेतले. रेहानच्या अनाकलनीय गोलंदाजीसमोर डरहॅमचे फलंदाज टिकू शकले नाहीत. रेहानने आपल्या गोलंदाजीदरम्यान फलंदाज नेड एकर्सली गुगली टाकून बाद केले. हा व्हिडिओ टी २० ब्लास्टने आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, ‘रेहान फलंदाजाला चकमा देण्यासाठी एक एरिअल गुगली फेकतो. ज्यावर फलंदाज मागे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न करतो. पण, चेंडू खेळपट्टीवर आदळताच तो पटकन आतील बाजूला वळतो आणि फलंदाज त्रिफळाचित होतो.’

हेही वाचा – भारतीय वंशाच्या लिसाने रचला इतिहास, एफआयसीएच्या अध्यक्षपदी झाली नियुक्ती

रेहान १३ वर्षांचा असतानाच त्याने आपल्या गोलंदाजीचे दर्शन घडवले होते. २०१६ मध्ये पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आला तेव्हा रेहानला नेट बॉलर बनवण्यात आले होते. याशिवाय, डिसेंबर २०२१ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केलेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला होता. त्याची गोलंदाजी शैली बघता तो लवकरच इंग्लंडच्या संघात दिसेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Story img Loader