बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विचारणा केली होती. मात्र, आपण हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी सांगितले.

महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात नियोजित आहे. मात्र, सध्या तेथील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे ‘आयसीसी’ला यजमानपदासाठी अन्य पर्यायांचा विचार करणे भाग पडले आहे.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Maha Vikas Aghadi And Mahayuti Battle For Votes
अग्रलेख : गॅरंट्यांचा शाम्पू!

‘‘महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत ‘आयसीसी’ने ‘बीसीसीआय’ला विचारणा केली. मात्र, मी स्पष्ट नकार दिला. आपल्याकडे त्या काळात (ऑक्टोबरमध्ये) मान्सून सुरू असेल. तसेच पुढील वर्षी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही भारतात होणार आहे. त्यामुळे सलग दोन विश्वचषकांचे आयोजन करण्यास मी उत्सुक नव्हतो,’’ असे शहा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>Independence Day 2024: महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने १५ ऑगस्ट रोजीच का जाहीर केली निवृत्ती? रैनाने केला मोठा खुलासा

तसेच आगामी क्रिकेट हंगामात भारतामध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन होणार नसल्याचेही शहा यांनी सांगितले. ‘‘आपल्याकडे दिवस-रात्र कसोटी सामना दोन दिवसांतच संपतो. त्यामुळे प्रेक्षक, प्रसारणकर्ते यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. आम्हाला या गोष्टींचाही विचार करावा लागतो,’’ असे शहा म्हणाले.