आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन यांना पदावरून पायउतार करण्यासाठी मान्यता नसलेल्या बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)आयपीएलसंदर्भातील प्रभारी अध्यक्ष सुनील गावस्कर यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला आहे.
‘‘सुंदर रामन यांचे आयपीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असणे हे आयपीएल आणि क्रिकेट खेळाच्या हिताचे नाही. या संदर्भातील वास्तवाकडे मी लक्ष वेधले आहे. या आशयाचे पत्र मी दिले होते. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही आणि माझ्या पत्राला प्रतिसादही मिळाला नाही. परंतु तरीही मी तुम्हाला सांगू इच्छितो की रामन या पदावर राहणे योग्य नाही,’’ असे वर्मा यांनी गावस्कर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयपीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर यापुढेही कार्यरत राहणाऱ्या रामन यांच्या संदर्भात वर्मा यांनी याआधीच आपला विरोध दर्शवला होता. आयपीएल फिक्सिंगसंदर्भात बीसीसीआयच्या दोन सदस्यांची चौकशी समिती घटनेला धरून नाही, अशा आशयाची जनहित याचिका वर्मा यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
सुंदर रामन यांच्या हकालपट्टीसाठी वर्मा यांचे गावस्करांवर दबावतंत्र
आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन यांना पदावरून पायउतार करण्यासाठी मान्यता नसलेल्या बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा
First published on: 08-04-2014 at 01:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remove sundar raman as ipl ceo verma tells gavaskar