आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन यांना पदावरून पायउतार करण्यासाठी मान्यता नसलेल्या बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)आयपीएलसंदर्भातील प्रभारी अध्यक्ष सुनील गावस्कर यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला आहे.
‘‘सुंदर रामन यांचे आयपीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असणे हे आयपीएल आणि क्रिकेट खेळाच्या हिताचे नाही. या संदर्भातील वास्तवाकडे मी लक्ष वेधले आहे. या आशयाचे पत्र मी दिले होते. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही आणि माझ्या पत्राला प्रतिसादही मिळाला नाही. परंतु तरीही मी तुम्हाला सांगू इच्छितो की रामन या पदावर राहणे योग्य नाही,’’ असे वर्मा यांनी गावस्कर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयपीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर यापुढेही कार्यरत राहणाऱ्या रामन यांच्या संदर्भात वर्मा यांनी याआधीच आपला विरोध दर्शवला होता. आयपीएल फिक्सिंगसंदर्भात बीसीसीआयच्या दोन सदस्यांची चौकशी समिती घटनेला धरून नाही, अशा आशयाची जनहित याचिका वर्मा यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा