आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीनंतर दोन दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेत विराट कोहली शेवटचे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत, विराटसह, बीसीसीआयची देखील इच्छा आहे, की त्याने कर्णधार म्हणून आपली आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द विश्वचषक ट्रॉफीसह संपवावी. यासाठी बीसीसीआय आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही स्टार खेळाडूंना टीम इंडियासोबत जोडू शकते. या खेळाडूंमुळे संघाच्या प्रशिक्षण आणि कंडीशनिंग सत्रांमध्ये संघाला मदत होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकबझच्या अहवालानुसार, निवड समितीने आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल, केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि गोलंदाज शिवम मावी, या सर्व खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षणामध्ये आवश्यक मदत देईल. यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितले जाऊ शकते, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.

हेही वाचा – शाळेत जाणाऱ्या क्रिकेटरनं मिताली राजला टाकलं मागे; २२ वर्षानंतर नोंदवला गेला ‘नवा’ विक्रम!

बीसीसीआयला टीम इंडियाच्या अंतिम खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वेळ आहे. आयसीसीने सुपर-१२ मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची अंतिम मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. सुपर-१२ टप्प्यात ज्या संघांचा समावेश आहे, ते संघ त्यांच्या सामन्याच्या ७ दिवस आधी संघ बदलू शकतात.

टी-२० वर्ल्डकपचा सुपर-१२ टप्पा २३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. टीम इंडिया थेट सुपर-१२ टप्प्यासाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे बीसीसीआय १५ ऑक्टोबरपर्यंत विश्वचषकाच्या संघात बदल करू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reports harshal patel venkatesh iyer and shivam mavi may join indian team to support t20 wc training adn