प्रान्डेली यांनी इटलीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली
नाताल : सुमार कामगिरीमुळे सलग दुसऱ्या विश्वचषकात प्राथमिक फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे इटलीचे प्रशिक्षक सेसार प्रान्डेली यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. चार वेळा विश्वचषक विजेत्या इटलीला सलग दुसऱ्या विश्वचषकात दुसरी फेरी गाठण्यात अपयश आले आहे.
‘‘इटलीच्या संघाला कामगिरीत अमूलाग्र सुधारणा करावी लागेल. मी हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. त्यात बदल होणार नाही,’’ असे प्रान्डेली यांनी सांगितले.
आयव्हरी कोस्टच्या लॅमोची यांचा पदत्याग
फोर्टालेझा : ग्रीसकडून पराभूत झाल्यानंतर आयव्हरी कोस्टचे विश्वचषक स्पध्रेची दुसरी फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आणि काही मिनिटांतच त्यांचे प्रशिक्षक सबरी लॅमोची यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मी संघाच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करूनच हा निर्णय घेतल्याचे लॅमोची यांनी सांगितले.
‘‘यंदाच्या विश्वचषक स्पध्रेसह माझा करार संपत आहे आणि त्याबाबत मला कोणताही पश्चात्ताप वाटत नाही. का, या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला समजावू शकणार नाही,’’ असे ४२ वर्षीय फ्रान्सवासी लॅमोची यांनी सांगितले. ‘‘आफ्रिकन चषक आणि विश्वचषक स्पध्रेत आमची कामगिरी चांगली झाली नाही, त्यामुळे पदाचा त्याग करण्याचा निर्णय योग्य आहे,’’ असे ते पुढे म्हणाले.

Story img Loader