भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. चाहत्यांनाही या आवडत्या स्टार्सच्या रोजच्या पोस्ट लाइक आणि शेअर करायला आवडतात. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने एक गूढ पोस्ट ट्वीटरवर शेअर केली आहे. हरभजनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हरभजनने ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे

भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू हरभजन सिंगने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंग एक कविता म्हणत आहे. हरभजनने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “आम्ही शांत आहोत त्याचा तुम्ही सर्वांनी आदर करा.” म्हणजेच हिंदीत त्याने म्हटले आहे की, “कदर करो हमारी खामोशी की हम तुम्हारी औकात छुपाए बैठे हैं.” हरभजन सिंगने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही सोप्या गोष्टी ज्या अनेकांना लागू होतात. वेळ आल्यावर सर्व काही सांगितले जाईल.” या व्हिडीओमध्ये हरभजन काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. “वेळ आल्यावर सर्व काही सांगितले जाईल”, असे त्याने या कॅप्शनमध्ये पुढे म्हटले आहे.

Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “दिल्लीत आमचं सरकार आल्यानंतर आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंत तोडणार”, राहुल गांधींचं मुंबईच्या सभेत मोठं विधान
Nitesh Chavan And Isha Sanjay
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्रीची सूर्यादादासाठी खास पोस्ट; म्हणाली, “यामुळेच मी तुला…”

या व्हिडीओशिवाय, हरभजनने चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मध्ये भारतीय संघाच्या विजयाची ट्वीटर पोस्ट देखील रिट्वीट केली आहे. त्या ट्वीटमध्ये भारताच्या त्या संघातील क्रिकेटपटूंच्या कामगिरीची चर्चा केली ज्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. माहितीसाठी की, हरभजन सिंग हा भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. मात्र, निवृत्तीनंतरही हरभजन सिंग कॉमेंट्री करताना दिसत आहे. हरभजन सिंगची कॉमेंट्रीही लोकांना आवडते आहे. चाहत्यांना हरभजनला ऐकायला आवडते. हरभजन कॉमेंट्रीशिवाय क्रिकेट एक्सपर्ट म्हणूनही काम करतो. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि रोज काहीतरी नवीन पोस्ट करत असतो.

हेही वाचा: Cheteshwar Pujara: टीम इंडियातून वगळल्याने पुजाराच्या वडिलांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “३५ वर्षाचा माझा मुलगा देशासाठी…”

चेतेश्वर पुजाराला संघातून वगळल्याने त्याने जाहीर नाराजी व्यक्त केली

हरभजन सिंगने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, “चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त भारतीय संघातील इतर काही वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी गेल्या दोन वर्षात काही विशेष चांगली झाली नाही. अशा परिस्थितीत पुजारासारख्या ‘या’ खेळाडूंबाबतही निवडकर्ते असा निर्णय घेताना दिसतील का? जरी खेळाडू कितीही मोठा असला तरी सर्वांसाठी असे निर्णय सारखेच असले पाहिजेत. जर तुम्ही पुजाराला महान खेळाडू मानत नसाल तर माझ्यासाठी इतर खेळाडूही महान नाहीत.” असे म्हणत त्याने विराट आणि रोहितला टोमणा मारला आणि बीसीसीआय निवड समितीवर टीका केली.