Kane Williamson on Neil Wagner’s retirement : सध्या न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलियाबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान, न्यूझीलंडचा महान वेगवान गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर नील वॅगनरच्या निवृत्तीवर न्यूझीलंड संघाचा माजी क्रिकेटर रॉस टेलरचे वक्तव्य समोर आले होते. ज्यामध्ये त्यांनी नील वॅगनरला सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडले असल्याचे सांगितले. त्यानंतर आता न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसनने रॉस टेलरचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
केन विल्यमसनची प्रतिक्रिया –
केन विल्यमसनने रॉस टेलरच्या विधानावर प्रत्युत्तर देत म्हटले की, “मला वाटत नाही की कोणीही नील वॅगनरला निवृत्ती घेण्यास भाग पाडले आहे. वॅगनर आधीच त्याच्या निवृत्तीबद्दल विचार केला होता. आम्ही ड्रेसिंग रूममध्येही बोललो होतो. वॅगनरने संघासाठी खूप काही केले आहे. त्याने दीर्घकाळ न्यूझीलंड क्रिकेटची सेवा केली आहे. गेल्या आठवड्यात त्याने खूप छान अनुभव घेतला आणि त्याने हे अद्भुत क्षण टीमसोबत शेअर केले.”
वॅगनर आणि टीम साऊदी यांच्यातील वादावर विल्यमसनची प्रतिक्रिया –
खरं तर, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात नील वॅगनर आणि टीम साऊदी यांच्यात थोडा वेळ बाचाबाची झाली होती, ती बरीच खेचली गेली होती. यावर केन विल्यमसन म्हणाला की, दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि भविष्यातही असेच राहतील. वॅग्नरच्या मैदानावरील क्षेत्ररक्षण खूप विनोदी होते. जे खूप मजेदाराही होते. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ईएसपीएनशी संवाद साधताना किवी संघाचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलर म्हणाला होता की, मला वाटते की वॅगनरची निवृत्ती सक्तीची झाली आहे. संघात अनुभवाची मोठी भूमिका असते. वॅगनर ज्या पद्धतीने आपल्या अनुभवाने पुढे जात होता, विरोधी संघातील खेळाडूही त्याच्याशी गप्पा मारत असत. कमिन्सनेही वॅगनरकडून त्याच्या योजनांबद्दल बरीच माहिती घेतली होती.
“नील वॅगनरला निवृत्तीची सक्ती करण्यात आली” – रॉस टेलर
रॉस टेलर म्हणाला, “नील वॅगनरला निवृत्तीची सक्ती करण्यात आली. या गोलंदाजाची पत्रकार परिषद ऐकली, तर तो शेवटच्या कसोटीनंतर निवृत्त होईल, असे सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याने स्वत:ला संघासाठी उपलब्ध करून दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी जिंकण्यासाठी मी वॅगनरच्या पुढे कोणाचाही विचार करू शकत नाही. मला खात्री आहे की वॅगनरच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाला खूप दिलासा मिळाला आहे आणि आता ते शांतपणे झोपले असतील.”