सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या विषयावर साऱ्या क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू असून त्याबाबत त्याचा एकेकाळचा सहकारी आणि भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने आपले मत मांडले आहे. ‘सचिनने भारताला एकहाती विजय मिळवून दिले आहे, पण कधीच त्याने एकटय़ाने पराभव ओढवून आणलेला नाही, त्यामुळे त्याच्या कारकीर्दीचा सन्मान करून निवृत्तीचा निर्णय त्याच्यावर सोडायला हवा,’ असे कुंबळे म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, आतापर्यंत १९२ कसोटी सामने कोणीही खेळलेला नाही, त्याच्या एवढय़ा ३४ हजार धावा कोणाच्या नावावर नाहीत, त्याचबरोबर १०० शतके झळकावण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. त्यामुळे तो सन्मानाचा हकदार असून त्याच्या निवृत्तीचा निर्णय त्याच्यावरच सोपवायला हवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा