मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ घोटय़ाच्या दुखापतीतून सावरत सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईच्या १५ खेळाडूंच्या चमूची घोषणा मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) शुक्रवारी करण्यात आली. त्यामध्ये शॉच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

इंदूर येथे २१ ते २८ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर महिन्यात झालेल्या कसोटी मालिकेपूर्वीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीला दुखापत झाली होती. त्यानंतर प्रथमच तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी होणार आहे.

मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, आकाश पारकर, एकनाथ केरकर, ध्रुमिल मटकर, शाम्स मुलानी, शुभम रांजणे, तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस.