भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाला जवळपास 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांनाही झिवा नावाची एक गोड मुलगीही आहे. मात्र आपल्या लग्नानंतर 8 वर्षांनी साक्षीने, धोनी व आपल्याला एकत्र आणणाऱ्या खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे. रॉबिन उथप्पामुळे मी व धोनी एकत्र आल्याचं साक्षी धोनीने एका इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलं आहे.

जुलै 2010 साली धोनी आणि साक्षी यांचा विवाहसोहळा पार पडला. 2015 साली दोघांनाही झिवा नावाची एक गोड मुलगीही झाली. आयपीएलच्या व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये साक्षी महेंद्रसिंह धोनीला पाठींबा देण्यासाठी हजर असते. साक्षीने नुकताच मुंबईमध्ये आपला तिसावा वाढदिवस साजरा केला, यावेळी साक्षी आणि धोनीने आपल्या खास मित्रांना आमंत्रण दिलं होतं.

Story img Loader