बिल्लाबाँग हायस्कूलच्या राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या रायना सलढाणाने बॉम्बे वायएमसीए आंतरशालेय आणि कनिष्ठ महाविद्यायलयीन जलतरण अजिंक्यपद स्पध्रेत चार विक्रमांसह पाच सुवर्णपदकांची कमाई केली. रायनाने १०० मीटर फ्रीस्टाइल, १०० मी. बॅकस्ट्रॉक, १०० मी. बटरफ्लाय आणि २०० मी. वैयक्तिक मिडले प्रकारांमध्ये विक्रमांसह सुवर्णपदक जिंकले. याशिवाय १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातही तिने सुवर्णपदकाची कमाई केली.
निकाल :
१३ वर्षांखालील मुली : १०० मीटर फ्रीस्टाइल : १. रायना सलढाणा, २. अनन्या महेरे, ३. वेदिका मखिजा, १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक : १. रायना सलढाणा, २. इशा कढी, ३. वेदिका मखिजा. १०० मी. बॅकस्ट्रॉक : १. रायना सलढाणा, २. वेदिका मखिजा, ३. इशा कढी. १०० मी. बटरफ्लाय : १. रायना सलढाणा, २. सई पाटील, ३. इशा कढी. २०० मी. मिडले : १. रायना सलढाणा, २. इशा कढी, ३. वेदिका मखिजा. १३ वर्षांखालील मुले : १०० मीटर फ्रीस्टाइल : १. नील रॉय, २. इशान नगरकट्टी, ३. आमिर अर्सीवाला. १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक : १. नील रॉय, २. रोहन अगरवाल, ३. इशान नगरकट्टी. १०० मी. बॅकस्ट्रॉक : १. नील रॉय, २. इशान नगरकट्टी, ३. रोहन अगरवाल. १०० मी बटरफ्लाय : १. नील रॉय, २. इशान नगरकट्टी, ३. आमिर अर्सीवाला. २०० मी. मिडले : १. नील रॉय, २. इशान नगरकट्टी, ३. सोहम चोपडेकर. १७ वर्षांखालील मुले : १०० मी. फ्रीस्टाइल : १. विराज प्रभू, २. अनिकेत जगताप, ३. किरण मॅथ्यूज. १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक : १. विराज प्रभू, २. मानन शाह, ३. मुफद्दल कापासी. १०० मी. बॅकस्ट्रॉक : १. विराज प्रभू, २. मानन शाह, ३. अनिकेत जगताप. २०० मी. मिडले : १. विराज प्रभू, २. मानन शाह, ३. अनिकेत जगताप.
रायना बोलो बोलो!
बिल्लाबाँग हायस्कूलच्या राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या रायना सलढाणाने बॉम्बे वायएमसीए आंतरशालेय आणि कनिष्ठ महाविद्यायलयीन जलतरण अजिंक्यपद स्पध्रेत चार विक्रमांसह पाच सुवर्णपदकांची कमाई केली.
First published on: 17-12-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reyna saldana won five gold medals in junior swimming championships