अपघातांची मालिका आणि अतिशय थरारक रंगलेल्या हंगेरी ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत रेड बुलच्या डॅनियल रिकार्डियोने बाजी मारली. शेवटच्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याचा सहकारी निको रोसबर्ग चौथा आला. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. या मोसमात पहिल्यांदाच सहारा फोर्स इंडियाच्या ड्रायव्हर्सना एकही गुण मिळवता आला नाही. सर्जिओ पेरेझ आणि निको हल्केनबर्ग यांना शर्यत पूर्ण करता आली नाही.

Story img Loader