Richard Kettleborough and Richard Illingworth on-field umpires for IND v AUS Final: भारतात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषका २०२३च्या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवार, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मैदानी पंच म्हणून रिचर्ड केटलबोरोची निवड करण्यात आली आहे. अशात आता भारतीय संघाच्या चाहत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक अंतिम सामन्यासाठी आयसीसीने रिचर्ड केटलबोरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांना मैदानी पंच म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान जोएल विल्सन तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत दिसणार आहे.

BCCI in Action Mode After India Streak Ending Defeat in Pune said No Optional Training Ahead of IND vs NZ Mumbai Test
IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
IND vs NZ Ravindra Jadeja cleverly run out William O Rourke in Pune test
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरच्या अचूक थ्रोवर रवींद्र जडेजाने हुशारीने विल्यम ओ रुकला केले रनआऊट, VIDEO व्हायरल
Rohit Sharma Argues With Umpire as They Stop Match Due to Bad Light in IND vs NZ Test Watch Video
IND vs NZ: बंगळुरू कसोटीत झाला वाद, रोहित शर्मा पंचांवर भडकला, किवी फलंदाजही गेले मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Match Updates in Marathi Mohammad Kaif on Rohit Sharma
IND vs NZ : रोहित शर्माकडून पहिल्या डावात कुठे झाली सर्वात मोठी चूक? मोहम्मद कैफने स्पष्टच सांगितलं
IND vs NZ Michael Vaughan Taunts India After 46 All Out in Bengaluru Test Indian Fans Gives Befitting Reply
IND vs NZ: “कमीत कमी भारत ३६…”, टीम इंडिया ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मायकेल वॉनने उडवली खिल्ली, भारतीय चाहत्यांनी ‘अशी’ केली बोलती बंद
IND vs NZ Who is William O'Rourke He Dismissed Virat Kohli KL Rahul on Duck in Bengaluru Test
IND vs NZ: विराट, राहुलला भोपळाही फोडू न देणारा विल्यम ओ रूक आहे तरी कोण? इग्लंडमध्ये जन्म अन् न्यूझीलंडकडून खेळतो क्रिकेट
Cameron Green ruled out of Test series against India in Border-Gavaskar Trophy 2024-25
IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू झाला बाहेर

उल्लेखनीय आहे की प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच रिचर्ड केटलबोरो हे भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत आयसीसी बाद फेरीतील सामन्यांमध्ये डोकेदुखी ठरले आहे. कारण केटलबोरो पंच असले की भारतीय संघाचा पराभव होतो, असे वारंवार घडले आहे. केटलबोरो अतिशय नावाजलेले पंच आहेत. आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट पंच पुरस्काराने गौरवण्यात आलेले पंच आहेत. पण ते असले की भारताला विजयाचा मार्ग दिसत नाही, असे बऱ्याचदा घडले आहे.भारताच्या प्रत्येक मोठ्या सामन्यात जेव्हा केटलबोरो पंच होते, तेव्हा भारताने तो सामना गमावला आहे.

हेही वाचा – IND vs AUS Final: एकदिवसीय विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया किती वेळा आलेत आमनेसामने, जाणून घ्या कोणाचे आहे वर्चस्व?

उदाहरणार्थ म्हणजे ते एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पंच होते. या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभूत व्हावे लागले. केटलबोरो पंच असले की भारतीय संघाचा पराभव होतो, असे वारंवार घडले आहे. केटलबोरो अतिशय नावाजलेले पंच आहेत. आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट पंच पुरस्काराने गौरवण्यात आलेले पंच आहेत. पण ते असले की भारताला विजयाचा मार्ग दिसत नाही, असे बऱ्याचदा घडले आहे.

हेही वाचा – IND vs AUS Final: विराट, रोहित किंवा शमी नव्हे, तर ‘हा’ खेळाडू फायनलमध्ये ठरणार ‘गेम चेजर’, गौतम गंभीरने सांगितले नाव

सामन्यादरम्यान पंच आणि सामनाधिकारी निवडण्याचा अधिकार आयसीसीला आहे. भारतीय क्रिकेट संघ इच्छा असूनही काही करू शकत नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माची विराट सेना कशी कामगिरी करणार, हे पाहण्यासारखे असेल. मात्र, चेन्नई येथे झालेल्या साखळी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेटने पराभव केला. मात्र, आता अंतिम सामन्यात मैदानी पंत म्हणून रिचर्ड केटलबोरोची निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहे.