Ricky Pontig criticized captain Rohit Sharma’s decision to drop R Ashwin: इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्लेइंग इलेव्हनबद्दल घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. त्याने रविचंद्रन अश्विनला मोठ्या लढतीत वगळले. यावर आता माजी खेळाडू रिकी पँटिगने प्रतिक्रिया दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आर अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करण्याच्या निर्णयावर रिकी पाँटिगने टीका केली. तो म्हणाला की, टीम इंडियाने पहिला डाव पाहून गोलंदाजीची निवड केली आहे. कांगारूंच्या संघात डाव्या हाताचे फलंदाज भरपूर आहेत, त्यामुळे रविचंद्रन अश्विन हा रवींद्र जडेजापेक्षाही खूप प्रभावी ठरला असता.
जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना जास्त त्रास देतो –
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रिकी पाँटिग म्हणाला, “भारताने सामन्याच्या पहिल्या डावासाठी फक्त गोलंदाजी आक्रमण निवडण्याची चूक केली. ऑस्ट्रेलियात संघांत अनेक डावखुरे फलंदाज आहेत. जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना जास्त त्रास देतो. मला खेळपट्टीवर गवत दिसले. हो गवत होते, पण खोलवर पाहिल्यावर मला ते सुकलेले दिसत होते.”
आश्विनला वगळणे हा एक कठीण निर्णय – रोहित शर्मा
नाणेफेक दरम्यान रविचंद्रन अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयाबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अवघड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो (आश्विन) आमच्यासाठी मॅचविनर राहिला आहे. त्याला वगळणे हा एक कठीण निर्णय आहे, परंतु तुम्हाला संघाच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.”
सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २४ षटकांनंतर २ बाद ७६ धावा केल्या आहे. सध्या खेळपट्टीवर मार्नस लाबूशेन (२६) आणि स्टीव्ह स्मिथ (४) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या दोन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.