Ricky Ponting and Justin Langer express displeasure over Shubman Gill: ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीवर कब्जा केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी स्कॉट बोलँडच्या चेंडूवर शुबमन गिल कॅमेरून ग्रीनच्या हाती झेलबाद झाला. शुबमन गिल बाद दिल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. यानंतर शुबमन गिलही सोशल मीडियावर व्यक्त झाला. यावर आता रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शुबमन गिलला आऊट दिल्याने वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. कारण रिप्लेमध्ये असे दिसत होते की, झेल पकडताना चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला होता. फील्ड अंपायरने या निर्णयासाठी थर्ड अंपायरचा आधार घेतला, तेव्हा वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यानंतर टीव्ही अंपायर रिचर्ड कॅटेलब्रो यांनी गिलला आऊट घोषित केले. या निर्णयावर भारतीय संघानेही नाराजी व्यक्त केली.
सामन्यादरम्यानच शुभमन गिलने या मुद्द्यावर ट्विट केल्याने या प्रकरणाने पेट घेतला. ट्विटमध्ये या झेलचा फोटो पोस्ट करताना, मॅग्निफायरसह डोके पकडल्याचा इमोजी टाकण्यात आला. यावर आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी गिलच्या या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – IND vs AUS: “भारतीय फलंदाजांनी बाबर-विल्यम्सनकडून शिकावे कसे…”; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान
निलंबनाची शिक्षाही होऊ शकते –
रिकी पाँटिंग क्रिकेट सेव्हनवर बोलताना म्हणाला होता, “शुबमन गिलला तिसर्या पंचांच्या निर्णयाकडे बोट दाखवल्याबद्दल दंड किंवा निलंबनाची शिक्षाही होऊ शकते. संपूर्ण जग त्याच्यासाठी हे करणार होते, पण त्याला असे काही करण्याची गरज नव्हती.” तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे माजी प्रशिक्षक आणि फलंदाज जस्टिन लँगरनेही असेच मत व्यक्त केले आहे.
सोशल मीडिया आज एक मोठे आव्हान –
फॉक्स क्रिकेटवर जस्टिन लँगर म्हणाला की, “गिलचे ट्विट काही प्रमाणात बेजबाबदार होते आणि ते त्याच्या अननुभवीपणाचे प्रतिबिंबित करते. आधुनिक काळातील क्रिकेटपटूंसाठी मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे सोशल मीडियाचा प्रसार आहे. सध्या आपण ज्या जगात वावरत आहोत, त्या जगात सोशल मीडियाचा बोलबाला आहे. मला विश्वास आहे की गिलचे ट्विट एका मर्यादेपर्यंत बेजबाबदार आहे आणि त्यांच्या अननुभवीपणाचे प्रतिबिंब आहे.”
रिकी पाँटिंगच्या म्हणण्यानुसार आयसीसीनेही शुबमन गिलवर लगेच दंडात्मक कारवाई केली. आयसीसीकडून सांगण्यात आले की, शुबमन गिलला कसोटीच्या चौथ्या दिवशी बाद दिल्याच्या निर्णयावर टीका केल्यामुळे त्याला दंड सुनावला आहे. शुबमन गिलने कलम २.७ चे उल्लंघन केले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणीशी संबंधित आहे. यामुळे त्याला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.