२०१९ या वर्षाचा शेवट भारतीय संघाने दमदार मालिका विजयाने केली. वेस्ट इंडिजविरूद्धच्या शेवटच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने पाहुण्या संघाला ४ गडी राखून धूळ चारली. भारताने २१ व्या शतकातील दुसऱ्या दशकात (२०१०-२०१९) उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदापासून ते २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या कामगिरीपर्यंत भारतीय संघाची भरभराट झाली. २०१९ च्या शेवटच्या मालिका विजयापर्यंत टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. या दशकातील (२०१०-२०१९) सर्वोत्तम ११ कसोटीपटूंची यादी रिकी पॉन्टींगने जाहीर केली आहे. या यादीत केवळ २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

मुलगी आरती करते, म्हणून टीव्हीच फोडून टाकला – शाहिद आफ्रिदी

या यादीत तब्बल चार कर्णधारांना पसंती दिली आहे. अ‍ॅलिस्टर कूक (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि विराट कोहली (भारत) या चार कर्णधारांना त्याने संघात स्थान दिले आहेत, पण त्यापैकी कर्णधार म्हणून पॉन्टिंगने विराटला पसंती दिली आहे. या संघात इंग्लंडचे सर्वाधिक चार खेळाडू इंग्लंडचे आहेत. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, भारत यांचे १-१ खेळाडू आहेत.

Wisden T20 team of decade : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना संधी

वाचा संपूर्ण संघ –

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
अ‍ॅलिस्टर कूक (इंग्लंड)
केन विल्यमसन (न्यूझीलंड)
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
विराट कोहली (भारत) (कर्णधार)
कुमार संगाकारा (श्रीलंका)
बेन स्टोक्स (इंग्लंड)
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया)
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
जेम्स अँडरसन (इंग्लंड)

…म्हणून त्याने धवनला मारल्या लाथा, चूक लक्षात येताच मागितली माफी

दरम्यान, सध्या सगळीकडे दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ जाहीर करण्याचे पीक आल्याने मी देखील संघ जाहीर करत आहे, असे पॉन्टिंगने लिहिले आहे.

Story img Loader