Ollie Robinson abuses Usman Khawaja: ॲशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना एजबस्टन येथे पार पडला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शतकवीर उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर ओली रॉबिनसनने अपशब्द वापरले. उस्मान ख्वाजाला १४१ धावांवर बाद केल्यानंतर ओली रॉबिनसनने अपशब्द आक्रमकपणे सेलिब्रेशन केले होते. सामन्यानंतर बोलताना इंग्लंडचा गोलंदाज म्हणाला होता की, मला याची खंत नाही. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने रॉबिन्सनचा खरपूस समाचार घेतला आहे.
ओली रॉबिनसनने आपल्या बचावात कांगारूंच्या माजी कर्णधाराचे नाव ओढले होत. यामुळेच ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराने निशाना साधला आहे. उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर अपशब्द वापरल्याबद्दल बोलताना ओली रॉबिन्सन म्हणाला, “आम्ही सर्वांनी रिकी पाँटिंग आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आमच्याशी असे वागताना पाहिले आहे.” पहिल्या कसोटीत एकूण २०६ धावा करणाऱ्या ख्वाजाने पहिल्या डावातील घटनेल महत्व दिले नाही आणि त्याला ‘मैत्रीपूर्ण विनोद’ म्हटले. परंतु रिकी पाँटिंगने आयसीसी रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये रॉबिन्सनला फटकारले.
मला काही फरक पडत नाही –
रिकी पाँटिंग म्हणाला, “जसे मी ऑली रॉबिन्सनच्या वक्तव्यानंतर म्हणालो होतो, इंग्लंडचा हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला नाही. त्यामुळे अॅशेस क्रिकेट खेळणे आणि चांगल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध खेळणे काय असते, ते त्यांना लवकर कळेल. ओली रॉबिन्सनने गेल्या आठवड्यापासून हे शिकले नसल्यास, तो ते हळू शिकत आहे. त्याने सांगितलेल्या काही गोष्टी, म्हणजे त्याने माझे नाव देखील घेतले, जे मला थोडेसे असामान्य वाटले. परंतु त्याचा मला काही फरक पडत नाही.”
हेही वाचा – Kasi Viswanathan: ‘त्याला वाईट वाटलं…’, धोनी आणि जडेजाच्या वादाच्या चर्चांवर सीएसकेच्या सीईओंचा मोठा खुलासा
रॉबिन्सनला मी १५ वर्षांपूर्वी काय केले याची काळजी –
पाँटिंग पुढे म्हणाला, “जर तो माझ्याबद्दल विचार करत असेल, तर त्या सामन्यात त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. १५ वर्षांपूर्वी मी काय केले याची त्याला चिंता आहे. तो खूप लवकर शिकेल की जर तुम्ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना ऍशेस मालिकेत वाद घालणार असाल, तर तुम्हाला ते तुमच्या प्रतिभेने सिद्ध करावे लागेल.”