ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात कॉमेंट्री करत असताना त्याची तब्येत बिघडली.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पाँटिंगच्या सहाय्यकांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. पाँटिंगला अस्वस्थ वाटत होते आणि म्हणून त्याला सावधगिरी बाळगताना तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते. वृत्तानुसार, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाँटिंगला लंचच्या सुमारास पर्थच्या रुग्णालयात नेण्यात आले. आता तो तिसऱ्या सत्रात कॉमेंट्री करताना दिसणार नाही.

पाँटिंग तिसऱ्या सत्रात कॉमेंट्री करणार नाही –

चॅनल सेव्हनच्या प्रवक्त्याने फॉक्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून सांगितले की रिकी पाँटिंग आजारी आहे आणि आजच्या उर्वरित कव्हरेजसाठी तो भाष्य करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पाँटिंगची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने स्वत: आपल्या सहकाऱ्यांना अस्वस्थ वाटण्याबद्दल सांगितले होते. तसेच काही लक्षणांबद्दल चिंताग्रस्त झाल्यानंतर त्यांनी चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीच्या चौथ्या दिवशी पाँटिंग कॉमेंट्रीसाठी उपलब्ध असेल की नाही याची पुष्टी चॅनल सेव्हनने अद्याप केलेली नाही. पाँटिंग हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षकही आहे.

हेही वाचा – IPL 2023: ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून निवृत्त, सीएसकेसाठी दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत

पाँटिंगची अचानक तब्येत बिघडने हे भितीदायक आहे. कारण यावर्षी ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पॉन्टिंगने या प्रकरणात कोणतीही निष्काळजीपणा बाळगू नये म्हणून रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पाँटिंग हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ दोनदा (२००३, २००७) एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनला आहे.

Story img Loader