Ricky Ponting has resigned as the head coach of Delhi Capitals : आयपीएल २०२४ मधील दिल्ली कॅपिटल्सच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा रिकी पॉन्टिंगने राजीनामा दिला आहे. याबाबत शनिवारी दिल्ली कॅपिटल फ्रँचायझीने एक्सवर पोस्ट शेअर करुन माहिती दिली. ऑस्ट्रेलियन दिग्गज गेल्या सात वर्षांपासून संघाचा भाग होता. फ्रँचायझीचा दीर्घकाळ कार्यकाळ असूनही पॉन्टिंग संघाला जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. आयपीएलच्या नुकत्याच संपलेल्या १७ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफ्समध्ये पोहोचता आले नव्हते. संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिला होता.
रिकी पॉन्टिंगने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला –
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगचे दिल्लीशी घट्ट नाते राहिले आहे. २०१८ पासून ते आतापर्यंत तो दिल्ली कॅपिट्सशी जोडला गेला होता. पॉन्टिंगच्या कोचिंगमध्ये दिल्लीच्या अनेक युवा खेळाडूंचा खेळ सुधारला. त्याच्या कोचिंगमध्ये दिल्लीने २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. फायनलमध्ये दिल्लीचा मुंबई इंडियन्सकडून ५ विकेट्सनी पराभव झाला होता. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.
रिकी पॉन्टिंगच्या राजीनाम्यानंतर दिल्ली कॅपिट्ल्सने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले, “प्रिय रिकी, तुम्ही मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होत आहात. हे व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. तुम्ही आम्हाला चार महत्वाच्या गोष्टी शिकवल्या, काळजी, बांधिलकी, दृष्टीकोन आणि प्रयत्न. या आमच्या गेल्या सात हंगामातील आठवणी आहेत.”
दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०१८ च्या लीग स्टेजपर्यंतच मर्यादीत राहिला होता. यानंतर २०१९ मध्ये प्लेऑफ्समध्ये पोहोचला. हा संघ २०२० मध्ये अंतिम सामना खेळला होता. यानंतर २०२१ मध्ये पुन्हा हा प्रवास प्लेऑफ्समध्ये पोहोचला. यानंतर आतापर्यंत तीन हंगामात संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचू शकरला. पॉन्टिंग देखील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये १० सामने खेळले आहेत. पॉन्टिंग २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो शेवटचा सामना २०१३ मध्ये खेळला होता.