Ricky Ponting on Akshar Patel: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने अक्षर पटेलबद्दल मंगळवारी एक खुलासा केला. रिकी पाँटिंगच्या मते दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना अक्षरने केलेले ‘किरकोळ तांत्रिक बदल’ भारतासाठी प्रभावी फलंदाज बनण्यास मदत केली. अक्षर आगामी आयपीएलमध्येही आपला चांगला फॉर्म कायम ठेवेल, अशी पाँटिंगला अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत, अक्षरने चार सामन्यांत तीन अर्धशतकांच्या मदतीने २६४ धावा केल्या. विराट कोहली (२९७ धावा) नंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. पाँटिंगने ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये सांगितले की, “मी अक्षरला बऱ्याच काळापासून ओळखतो. जेव्हा मी पहिल्यांदा मुंबई संघात सामील झालो, तेव्हा तो संघातील एक तरुण खेळाडू होता.”

Matt Henry
Ind vs New: वर्ल्डकपच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्या मॉट हेन्रीनेच दिला दणका; 5 विकेट्स आणि एक अफलातून झेल
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Border Gavaskar Trophy Sanjay Manjrekar statement on Virat Rohit
विराट-रोहितचा काळ गेला, आता ‘हा’ खेळाडू भारताचा सर्वोत्तम खेळाडू; Border Gavaskar Trophy पूर्वी संजय मांजरेकरांचं वक्तव्य
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण
IND vs BAN 1st T20 Match Hardik Pandya broke Virat Kohlis record for most match winning sixes in T20I
Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स

पाँटिंग म्हणाला, “मला माहित होते की त्याच्याकडे फलंदाजीचे कौशल्य आहे. पण गेल्या दोन वर्षात तो आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ते कौशल्य दाखवू शकला नाही.” पाँटिंग म्हणाला, “आम्ही त्याच्या फलंदाजीत काही बदल केले. आम्ही त्याच्या नितंब आणि खांद्याच्या स्थितीत किरकोळ फेरबदल केले, ज्यामुळे त्याला उजव्या हाताचे वेगवान गोलंदाजांना आणि शॉर्ट पिच चेंडू खेळण्यास मदत झाली. पूर्वी शॉर्ट पिच बॉल्स ही त्याची कमजोरी असायची.”

हेही वाचा – इतका राग! नॉन स्ट्रायकर एंडवर बाद होताच संतापला फलंदाज; रागाच्या भरात केलं अस काही की, VIDEO होतोय व्हायरल

अक्षरने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पाच वर्षे खेळून आपल्या खेळात सुधारणा केली. गेल्या चार हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. पाँटिंग हा दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आहे.

मालिकेदरम्यान त्याने फलंदाजी केलेल्या पाचपैकी तीन डावांमध्ये अक्षराने ७० पेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या कसोटीत त्याने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या, आठव्या विकेटसाठी रवींद्र जडेजा सोबत २११ चेंडूत ८८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर नवव्या विकेटसाठी मोहम्मद शमीसोबत ५२ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियासाठी अडचणी निर्माण केली.

हेही वाचा – Team India: सुनील गावसकरांची मोठी भविष्यवाणी; २०२३ च्या विश्वचषकानंतर ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार होऊ शकतो

त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने ११५ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या. तसेच अक्षरने अंतिम कसोटीत विराट कोहलीसोबत १६२ धावांच्या भागीदारीत ७९ धावा केल्या. या दरम्यान विराट कोहलीने तीन वर्षांपासून सुरु असलेला कसोटी शतकांचा दुष्काळ संपुष्टात आला.