Ricky Ponting big statement on Gautam Gambhir: बॉर्डर गावसकर ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीर आणि रिकी पॉन्टिंग या दिग्गजांमध्ये वक्तव्यांवर उत्तर प्रत्युत्तर सुरू आहे. रिकी पॉन्टिंगने न्यूझीलंडविरूद्धच्या भारताच्या कसोटी पराभवानंतर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली होती. यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषेत रिकी पॉन्टिंगला चांगलंच सुनावलं होतं. यावर आता पॉन्टिंगची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रिकी पॉन्टिंग विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल म्हणाला होता की, “मी नुकतीच विराटची आकडेवारी पाहिली, त्यात असे दिसले आहे की गेल्या पाच वर्षांत त्याने फक्त दोन ते तीन कसोटी शतके झळकावली आहेत. ते मला योग्य वाटलं नाही. पण जर ते खरे असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षांत केवळ दोन कसोटी सामन्यात शतकं झळकावणारा टॉप ऑर्डरमधील फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा कदाचित दुसरा कोणी नसेल.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

हेही वाचा – Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका

गौतम गंभीरला पॉन्टिंगच्या या वक्तव्याबाबत जेव्हा पत्रकार परिषदेत जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा गंभीर म्हणाला, “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याला विराट आणि रोहितची चिंता नसावी. ते दोघेही एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही साध्य केलं आहे आणि भविष्यातही ते कायम साध्य करत राहतील. मला वाटतं, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अजूनही खूप कठोर परिश्रम करतात.”

हेही वाचा – Most Expensive Players in IPL: IPL इतिहासातील सर्वात १० महागडे खेळाडू आहेत तरी कोण? युवराज सिंगचा रेकॉर्ड अजूनही कायम

गंभीरच्या या वक्तव्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारानेही प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियन चॅनल 7 स्पोर्ट्सशी बोलताना पाँटिंगने गंभीरच्या प्रतिक्रियेवर आपले मत मांडले आणि म्हणाला, “माझ्यावर त्याच्यावर, त्याच्या कामगिरीवर कोणतीही टीका केली नाही. मी म्हणालो की त्याने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे आणि तो ऑस्ट्रेलियात तो पुन्हा पुनरागमन करेल. जर तुम्ही विराटला विचाराल तर मला खात्री आहे की तो थोडासा चिंतेत असेल कारण त्याला मागील वर्षांप्रमाणे शतकं झळकावता आली नाहीत.”

गंभीरच्या प्रतिक्रियेवर पॉन्टिंग म्हणाला की, “प्रतिक्रिया वाचून मला आश्चर्य वाटले, परंतु प्रशिक्षक गौतम गंभीरला मी ओळखतो. तो खूप चिडखोर स्वभावाचा आहे, म्हणून तो जे काही बोलला त्याचे मला आश्चर्य वाटले नाही.”

हेही वाचा – Monkeygate Controversy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील प्रसिद्ध मंकीगेट प्रकरण काय होतं? हरभजन-सायमंड्समध्ये त्यावेळी नेमका कसा झाला वाद?

भारत आणि ऑस्ट्रेलिया २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३-० अशा पराभवामुळे भारतीय क्रिकेटचे मनोधैर्य खचले आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका कोणत्याही किंमतीवर जिंकावीच लागेल. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला किमान ४ कसोटी सामने जिंकावे लागतील.

Story img Loader