ऑस्ट्रेलियात २००८ साली झालेल्या मालिकेदरम्यान, हरभजनने ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडू सायमंडला ‘माकड’ म्हणून हिणविल्याच्या प्रकरणात सचिनने आपल्या जबाबात हरभजन सिंगच्या बाजून साक्ष दिली. सचिनने असे का केले? हे आताही माझ्या लक्षात आलेले नाही. हा प्रश्नचिन्ह अजूनही माझ्यासमोर आहे. असे रिकी पॉटिंगने म्हटले आहे.
पॉटिंग म्हणाला, “जून्या आठवणीत माझ्यासमोर आजही तोच क्षण उभा राहतो. क्रिकेटमध्ये नेहमी सत्याची बाजूने खेळणाऱया सचिनने. प्रकरणाच्या चौकशी दरम्यान घेण्यात येणाऱया साक्षीत सचिनने जबाब देताना हरभजनची बाजू का घेतली? यावरून त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. तो अजूनही मिटलेला नाही.”
२००८ साली सिडनीमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्यू सायमंडला ‘माकड’ म्हणून हरभजनने हिणवले होते. यावरून दोन्ही बाजूच्या प्रत्यक्षदर्शींचा जबाब घेण्यात आला होता. सचिननेही त्यावेळी प्रत्यक्षदर्शीम्हणून जबाब दिला. सचिनने जबाबात हरभजनची बाजू घेतली होती.

Story img Loader