कर्णधार म्हणून यशस्वी कारकीर्द नावावर असलेला रिकी पॉन्टिंग नेहमीच आपल्या वाचाळपणासाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही पॉन्टिंगचा वाचाळपणा अद्याप संपलेला नाही. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणाऱ्या ‘मंकीगेट’ प्रकरणात सचिन तेंडुलकरची भूमिकेबाबत पॉन्टिंगने शंका घेतली आहे. ‘द क्लोज ऑफ प्ले’ पुस्तकात पॉन्टिंगने ही मुक्ताफळं उधळली आहेत. मंकीगेट प्रकरणात हरभजन सिंगला वाचवण्यात सचिन तेंडुलकरची भूमिका निर्णायक होती. सचिनच्या या कृतीने त्यावेळी धक्का बसल्याचे पॉन्टिंगने म्हटले आहे.
हे प्रकरण तटस्थ लवादापुढे चालवले गेले तेव्हा सचिनने हरभजनची बाजू घेतली. मात्र अँड्रय़ू सायमंड्सला उद्देशून वर्णभेदी उद्गार काढल्याप्रकरणी सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली. त्यावेळी सचिनने काहीच प्रतिक्रिया का दिली नाही असा सवाल सचिनने केला आहे. माइक प्रॉक्टर यांच्यासमोर झालेल्या पहिल्याच सुनावणीच्या वेळेला सचिनने ही भूमिका का मांडली नाही असे पॉन्टिंगने म्हटले आहे.
मॅकडरमॉट ऑस्ट्रेलियाचे कसोटी गोलंदाजी प्रशिक्षक
सिडनी : माजी वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉट ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पुन्हा काम पाहणार आहेत. वर्षभरापूर्वीच त्यांनी हे पद सोडले होते. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द असलेल्या मॅकडरमॉट यांनी कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत नसल्याच्या मुद्दय़ावरून राजीनामा दिला होता. मात्र वर्षभरातच त्यांनी आपला निर्णय बदलत गोलंदाजीचे प्रशिक्षकत्व स्वीकारले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
‘मंकीगेट’ प्रकरणातील सचिनच्या भूमिकेबाबत साशंकता – पॉन्टिंग
कर्णधार म्हणून यशस्वी कारकीर्द नावावर असलेला रिकी पॉन्टिंग नेहमीच आपल्या वाचाळपणासाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून

First published on: 18-10-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ricky ponting rakes up monkeygate questions sachin tendulkars role