Ricky Ponting’s reaction to Shubman Gill’s wicket: लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. मात्र यादरम्यान टीम इंडियाचा खेळाडू शुबमन गिलला बाद देण्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. यावर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर चाहते आणि तज्ज्ञांचे असे मत आहे की, शुबमनला तिसऱ्या पंचाने चुकीच्या पद्धतीने आऊट दिले. पण त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने शुभमन गिलच्या वादग्रस्त झेलवर प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर तो म्हणतो की पंचाचा निर्णय योग्य होता.

मला खरंच वाटतं की चेंडूचा काही भाग जमिनीला टेकला – रिकी पाँटिंग

आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत रिकी पाँटिंग म्हणाला की, “खरं तर मला वाटतं की चेंडूच्या काही भागाचा जमिनीला स्पर्श झाला होता आणि अंपायरचा अर्थ असा आहे की, जोपर्यंत जमिनीवर चेंडू लागण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाचे पूर्ण नियंत्रण असते, तोपर्यंत तो बाद असतो. त्यामुळे नेमके तेच घडले असे मला वाटते. प्रत्यक्षात ते जमिनीपासून सहा किंवा आठ इंच वर आले आणि त्यानंतरच दुसरी कृती झाली.”

हेही वाचा – PCB vs BCCI: श्रीलंका-पाकिस्तान आशिया कपचे यजमानपद भूषवणार, हायब्रीड मॉडेलला मिळाली मान्यता, अहवालात मोठा खुलासा

आपला मुद्दा पुढे चालू ठेवत तो पुढे म्हणाले की, “मला खात्री आहे की याबद्दल खूप चर्चा होईल आणि कदाचित ऑस्ट्रेलियापेक्षा भारतात याबद्दल जास्त चर्चा झाली असेल. भारतातील प्रत्येकाला वाटेल की तो आऊट नाही आणि ऑस्ट्रेलियातील प्रत्येकाला वाटेल की तो आऊट आहे. जर हे मैदानावर बाद दिले असते, तर मला असे वाटते की तिसर्‍या पंचाला तो निर्णय बदलण्यासाठी पुरावे शोधावे लागले असते आणि मला वाटत नाही की यासाठी पुरावे असतात.”

रिकी पाँटिंग म्हणाला की, “मी हे यासाठी म्हणत आहे कारण सॉफ्ट सिग्नल शिवायही थर्ड अंपायरला वाटले की तो आऊटच आहे. दिवसाच्या शेवटी, मला वाटते की कदाचित योग्य निर्णय घेतला गेला आहे.” शुबमन गिलला आऊट देण्याबद्दलची चर्चा चांगलीच रंगली आहे.