Ricky Ponting statement on Why he not accepts India head coach offer: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयने निवेदन जाहीर केले आहे. रिकी पाँटिंग, स्टीफन फ्लेमिंग ही नाव सध्या चर्चेत आहेत. पण यादरम्यान पाँटिंगने मोठे वक्तव्य दिले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती रिकी पाँटिंगने दिली. मात्र, सध्या योग्य वेळ नसल्याचे त्याने म्हटले आहे. पाँटिंगने यामागचे कारणही सांगितले आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे ही IPL फायनलच्या दुसऱ्या दिवशी आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या एका अहवालात आधीच सांगितले आहे की राहुल द्रविडला त्याचा कार्यकाळ वाढवू इच्छित नाही. यादरम्यान पॉंटिंगने दिलेल्या वक्तव्याने सर्वांच लक्ष वेधलं आहे. पाँटिंगने सांगितले की, त्याला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हायचे आहे परंतु सध्या दिल्ली कॅपिटल्सचे (डीसी) मुख्य प्रशिक्षक असल्याने आणि ऑस्ट्रेलियातील संबंधित काम पाहता ही भूमिका स्वीकारणे योग्य वाटत नाही त्याच्यासाठी ही वेळ योग्य नसल्याचे त्याने सांगितले.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी

हेही वाचा – RCB vs RR: पराभवानंतर अखेरचा सामना खेळलेल्या कार्तिकला विराटने दिला धीर, RCB ने खास अंदाजात दिला निरोप; VIDEO

आयसीसी रिव्ह्यूशी संवाद साधताना पॉन्टिंग म्हणाला, “मी यासंबंधीचे अनेक अहवाल पाहिले आहेत. सहसा या गोष्टी सोशल मीडियावर तुम्हाला कळण्यापूर्वीच समोर येतात. आयपीएलदरम्यान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी माझ्याशी चर्चा करण्यात आली. मला या भूमिकेत रस आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेकदा चर्चा झाली.

पॉंटिंगने पुढे सांगत असताना ही जबाबदारी का घेणार नाही याचे कारणही देताना म्हटले, “मला वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनायला नक्कीच आवडेल. पण सध्या माझ्याकडे दुसरे काम आहे आणि मला माझा वेळ कुटुंबासोबतही वेळ घालवायचा आहे. सर्वांना माहित आहे की जर तुम्ही भारतीय संघाचे प्रशिक्षक असाल तर आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून सहभागी होऊ शकत नाही. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होणं म्हणजे वर्षातील १० ते ११ महिने संघासोबत राहावे लागेल. मी सध्या ज्या प्रकारचे जीवन जगतो ते लक्षात घेता ही भूमिका माझ्या जीवनशैलीत बसत नाही.”

हेही वाचा – हार्दिक पंड्या – नताशा स्टॅनकोविक विभक्त होणार? इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल, चर्चांना उधाण

मात्र, पाँटिंगने ही भूमिका स्वीकारण्याची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही. त्यांचा धाकटा मुलगा फ्लेचर याने त्यांना भूमिका स्वीकारण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “माझे कुटुंब आयपीएलसाठी गेले पाच आठवडे माझ्यासोबत आहेत, ते सर्व माझ्यासोबत दरवर्षी भारतात येतात, जेव्हा मी माझ्या मुलाला सांगितले की मला प्रशिक्षकपदाची ऑफर आली आहे. तेव्हा तो म्हणाला, ही ऑफर स्वीकारा, पुढील काही वर्षांसाठी मला भारतात राहायला आवडेल. माझे कुटुंबीय इतकं भारतावर आणि येशील क्रिकेटवर प्रेम करतात. पण सध्याच्या घडीला ही ऑफर स्वीकारणं माझ्या जीवनशैलीमध्ये बसणार नाही.

पॉन्टिंग सध्या होबार्ट हरिकेन्सचा स्ट्रॅटेजी प्रमुख आहे आणि एमएलसीमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून वॉशिंग्टन फ्रीडमसोबत दोन वर्षांचा करारही केला आहे. आगामी टी-२० विश्वचषकानंतर MLC चा दुसरा हंगाम सुरू होईल. पाँटिंगने यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टी-२० आणि एकदिवसीय संघांसोबतही काम केले आहे.

बीसीसीआयने नुकतेच गौतम गंभीरसोबतही मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधला होता. स्टीफन फ्लेमिंग आणि जस्टिन लँगर यांचीही नावे या शर्यतीत आहेत, अशी माहिती काही अहवालांमध्ये समोर आली आहे.