रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. या घटनेमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने विजयी सुरुवात केली आणि मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने खुलासा केला आहे, की इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL २०२१) मागील हंगामात त्याला भारताच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर देण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाँटिंगने असा दावाही केला, की जे लोक त्याच्याकडे येत होते ते त्याला पद देण्यास ‘अत्यंत उत्सुक’ होते. मात्र, पाँटिंगने कामाच्या ताणामुळे ही ऑफर स्वीकारली नाही. आयपीएल फ्रेंचायझी आणि चॅनल सातमधील आपली भूमिका सोडू इच्छित नाही, असेही पाँटिंग म्हणाला. तो ‘द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्ट’वर म्हणाला, ”मी या नोकरीत वर्षातून ३०० दिवस भारतात राहतो. होय, बघा, आयपीएलदरम्यान माझे काही लोकांशी बोलणे झाले होते. ज्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता ते यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते हे तुम्हाला माहीत आहे.”

हेही वाचा – पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरला करोनाची लागण; म्हणाला, ‘‘तुमच्या प्रार्थनांची गरज…”

पाँटिंग म्हणाला, ”जर मी ऑफर स्वीकारली असती, तर मला आयपीएल सोडावे लागले असते, मला चॅनल-७ मधून देखील वेगळे व्हावे लागले असते, त्यामुळे मी नकार दिला आणि मी ते करू शकत नाही असे सांगितले. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पाँटिंगने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याच्या अंतर्गत, दिल्ली २०१९ पासून सलग तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. एवढेच नव्हे, तर २०२० मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली.

कुटुंब असूनही राहुल द्रविडने हे काम करण्यास होकार दिल्याबद्दल रिकी पाँटिंगनेही आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, ”मला आश्चर्य वाटते की द्रविडने ही ऑफर स्वीकारली. अंडर-19 च्या भूमिकेत तो किती खूश होता, याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. मला त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल माहीत, त्यामुळे त्याने ही जबाबदारी उचलण्यास होकार दिल्याने मला आश्चर्य वाटले.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ricky ponting reveals he was offered indian cricket team head coach post adn