विराट कोहलीने जेव्हा भारतीय कसोटी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली तेव्हा त्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारताचा यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराटने आपली छाप पाडली. तो अजून काही काळ संघाचा कर्णधार राहिला असता, पण त्याने आपला प्रवास थांबवला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही विराटच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या वर्षी टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, निवड समितीने विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवले. त्यानंतर कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर १५ जानेवारीला कसोटी कर्णधारपद सोडले.

हेही वाचा – VIDEO : पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वांना आठवला धोनी; फलंदाजानं खेळला जबरदस्त ‘हेलिकॉप्टर शॉट’!

आयसीसीच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत, पाँटिंग म्हणाला, ”मला आश्चर्य वाटले. आयपीएल (२०२१) पुढे ढकलण्याआधी माझी विराटशी चांगली चर्चा झाली. तो मर्यादित क्रिकेटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याबद्दल आणि कसोटीतील कर्णधारपद पुढे नेण्याबद्दल बोलत होता. त्याला हे कसोटीच्या कर्णधारपदाची खूप आवड होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने बरेच काही साध्य केले. त्यामुळे विराटचा निर्णय ऐकून मला खरोखरच धक्का बसला.”

”मला धक्का बसला, पण नंतर मी इतर गोष्टींबद्दल विचार करू लागलो, अगदी कर्णधार म्हणून मी माझा कालावधी आठवला. मी माझा रेकॉर्ड पाहिला, तर मला असे वाटते की, मी मला मिळालेल्या काळापेक्षा जास्त वर्षे खेळलो”, असे पाँटिंगने म्हटले.