Ricky Ponting said he was offered to become England’s Test coach before Brendon McCullum: जेव्हापासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) ब्रेंडन मॅक्क्युलमला त्याच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवले आहे, तेव्हापासून संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाने १४ पैकी ११ सामने जिंकले आहेत. ब्रेंडन मॅक्क्युलमच्या कोचिंगखाली इंग्लंडचा संघ नवनवे विक्रम रचत आहे. पण तो इंग्लंड क्रिकेट बोर्डाची पहिली पसंती कधीच नव्हता, असा खुलासा रिकी पाँटिंगने केला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ब्रेंडन मॅक्क्युलमच्या आधी रिकी पाँटिंगला प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने स्वतः याचा खुलासा केला आहे. रिकी पाँटिंगने म्हटले आहे की, ब्रेंडन मॅक्क्युलमने पदभार स्वीकारण्यापूर्वी त्याला ईसीबीने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी संपर्क साधला होता.

रिकी पाँटिंगच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्सने २०२० च्या आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. रिकी पाँटिंगने बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्ससाठी रणनीती प्रमुख म्हणूनही काम केले आहे. अलीकडेच, रिकी पाँटिंगने खुलासा केला की त्याला इंग्लंड क्रिकेट संघाच्या कसोटी फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर मिळाली होती.

हेही वाचा – Mukesh Kumar: टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची टीम इंडियात निवड! प्लेइंग इलेव्हनध्ये मिळणार का संधी?

रिकी पाँटिंगला सांगितले की त्यांना रॉबकडून रिक्त पदाबद्दल कॉल आला होता, जो एप्रिल २०२२ मध्ये ईसीबीच्या पुरुष क्रिकेट संचालक म्हणून कार्यभार स्वीकारणार होता, परंतु त्याने त्यास नकार दिला होता. पाँटिंगने या आठवड्यात गुरिल्ला क्रिकेटला सांगितले की, ब्रेंडनने पदभार स्वीकारण्यापूर्वी मला खरोखर विचारले होते.

पाँटिंगने या आठवड्यात गुरिल्ला क्रिकेटला सांगितले की, “ब्रेंडनने पदभार स्वीकारण्यापूर्वी मला खरोखर विचारले गेले होते. रॉबर्ट कीने कार्यभार हाती घेताच त्याचे मला कॉल आले होते. पण मी माझ्या आयुष्यात जिथे आहे तिथे पूर्णवेळ आंतरराष्ट्रीय कोचिंग नोकरीसाठी मी तयार नाही. मी जितका प्रवास केला किंवा करुन झाला आहे. आता मला छोट्या मुलांपासून दूर राहायचे नाही जितक मी अगोदर राहिलो आहे. ब्रेंडनबद्दल बोलायचे तर, त्याचा परिवार आजच येत आहे. जेव्हा तुमची शाळेत जाणारी मुले असतात, त्यावेळी त्यांना इकडे-तिकडे घेऊन जाणे अवघड असते, जे मला करायचे नाही.”

Story img Loader