फिलिप ह्य़ुजेसकडे अ‍ॅडम गिलख्रिस्ट याच्यासारखी धडाकेबाज वृत्ती होती. आव्हान स्वीकारून खेळणे यातच तो आनंद मानत असे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगने ह्य़ुजेसला श्रद्धांजली वाहिली.
‘‘आफ्रिकेतील खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती. त्या वेळी २० वर्षांच्या या खेळाडूने डेल स्टेनसारख्या वेगवान गोलंदाजाला त्याच्या डोक्यावरून षटकार ठोकला होता. हा फटका माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय होता. दरबान कसोटीत १६० धावांची अप्रतिम खेळी त्याने साकारली होती,’’ असे पॉन्टिंगन म्हणाला.

ह्य़ुजेसविना ड्रेसिंगरूम सुने-सुने -क्लार्क
हसतमुख असणाऱ्या फिल ह्य़ुजेसशिवाय ऑस्ट्रेलियन संघाचे ड्रेसिंगरूम आता सुने-सुने भासणार आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने आपल्या मित्राला आदरांजली वाहिली. तो म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलिया संघाचे किती नुकसान झाले आहे, हे मी शब्दांत सांगू शकणार नाही. त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. ह्य़ुजेसच्या निधनामुळे जागतिक क्रिकेटचेही अपरिमित नुकसान झाले आहे. ह्य़ुजेसची ६४ क्रमांकाची एकदिवसीय क्रिकेटमधील जर्सी यापुढे कुणालाही न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची उणीव आम्हाला सदैव जाणवत राहील.’’

Story img Loader