न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्‍सने ज्यावेळी कर्णधार ब्रॅन्डन मॅक्क्युलमला सामनानिश्चितीबाबत विचारले होते त्या वेळी मी उपस्थित होतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने सांगितले.
केर्न्‍सविरुद्ध येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पॉन्टिंगची साक्ष झाली. या प्रकरणाबाबत त्याने सांगितले की, ‘‘२००८ मध्ये भारतात मी मॅक्क्युलमसमवेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होतो. त्यावेळी आम्ही हॉटेलच्या एकाच खोलीत राहत होतो. त्या वेळी मॅक्क्युलमला केर्न्‍सकडून दूरध्वनी आला. मात्र त्या वेळी हा दूरध्वनी व्यवसायाबाबत असल्याचे त्याने सांगितले आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पाच मिनिटे त्यांचे संभाषण सुरू होते.’’
केर्न्‍सचे वकील ऑर्लान्डो पॉनवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने सांगितले की, ‘‘हा दूरध्वनी नेमका कोणाचा होता हे कळू शकले नाही.’’

Story img Loader