Rinku Singh broke Suryakumar Yadav’s record for most runs : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात पराभवाने केली. टीम इंडियाला तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. डर्बनमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सलग तिसरा पराभव झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना इंदूर आणि पर्थमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर डर्बनमधील सामना पावसामुळे झाला नाही. या सामन्यात युवा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकू सिंगने मोडला सूर्यकुमार यादवचा विक्रम –

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील या क्रिकेटपटूची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ ११ सामन्यांची आहे, परंतु जेव्हाही त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने प्रभावित केले आहे. दुसऱ्या टी-२०मध्ये रिंकू सहाव्या षटकातच फलंदाजीला आला. तेव्हा संघाची ५.५ षटकात ३ विकेट गमावून आणि ५५ धावा होती. यानंतर रिंकू सिंगने ३९ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. त्याचबरोबर टीम इंडियाला १८० धावांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली. या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला. रिंकूने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पहिल्या ७ डावात २४८ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने तितक्याच डावात २४३ धावा केल्या होत्या.

रिंकूने चोख निभावली फिनिशरची भूमिका –

भारताकडून पहिल्या सात डावांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर आहे. त्याच्या २९० धावा आहेत. केएल राहुलच्या २८० धावा आहेत. तर दीपक हुडाच्या २७४ धावा आहेत. रिंकू सिंगने पाच्वाय आणि सहाव्या क्रमांकावर या धावा केल्या आहेत. या स्थितीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या वाट्याला जास्त चेंडू येत नाहीत. त्याला संघाच्या स्थितीनुसार खेळावे लागते. आतापर्यंत रिंकूने फिनिशरची भूमिका खूप छान साकारली आहे.

हेही वाचा – IND vs SA 2nd T20: सूर्यकुमार-रिंकू सिंहचे अर्धशतक व्यर्थ! दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून दणदणीत विजय

रिंकू सिंग सात डावात फक्त एकदाच अपयशी –

रिंकू सिंगच्या चमकदार कामगिरीचा अंदाज यावरून लावता येतो की, तो सातपैकी केवळ एका डावात अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-२० मध्ये तो सहा धावा करून बाद झाला होता. तो चार डावात नाबाद राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे अर्धशतक हे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठरले. त्याने सात डावात १८३.७० च्या स्ट्राईक रेटने २४८ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – रिंकू सिंगचं खळखट्याक, मीडिया बॉक्सची फोडली काच

भारताने पाच वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० सामना गमावला आहे. टीम इंडियाचा शेवटचा पराभव २०१८ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर झाला होता. भारताविरुद्धचा हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १४ डिसेंबरला होणार आहे. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला, तर मालिका हातातून जाईल. २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारताने शेवटची टी-२० मालिका गमावली होती. त्यानंतर २०१८ मध्ये भारताने २-१ असा विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku singh broke suryakumar yadavs record for most runs in first seven t20i innings in ind vs sa 2nd t20 vbm
Show comments