Rinku Singh has jumped 46 places in the latest ICC T20 batting rankings : टीम इंडियाचे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर फायदा झाला आहे. सूर्यकुमार आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे रेटिंग पॉइंट आणखी वाढले आहेत. त्याचबरोबर रिंकूने ४६ स्थानांची मोठी झेप घेतली आहे. सूर्यकुमारने केवळ ३६ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. यामुळे त्याला १० रेटिंग पॉइंट मिळाले. त्याचे एकूण ८६५ रेटिंग पॉइंट आहेत.

सूर्यकुमार यादवशिवाय ऋतुराज गायकवाड भारतातून पहिल्या दहामध्ये सातव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी, टॉप १० मध्ये, रीझा हेंड्रिक्सला एका स्थानाचा फायदा झाला आहे आणि तो आठव्या स्थानावर आहे. यशस्वी जैस्वाल १० स्थानांचा फटका बसला असून आता २९ व्या स्थानावर आहे. रिंकू सिंगला ४६ स्थानांचा मोठा फायदा झाला आहे आणि तो आता टॉप १०० मध्ये ५९ व्या स्थानावर आहे, तर तिलक वर्मा १० स्थानांच्या वाढीसह ५५ व्या स्थानावर आहे.

Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

रवी बिश्नोई गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे, तसेच दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी दोन स्थानांनी १० व्या स्थानावर पोहोचला आहे. टॉप १० च्या बाहेर कुलदीप यादव पाच स्थानांच्या फायद्यासह ३२ व्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत एडन मार्करामने दोन स्थानांनी प्रगती केली आहे.

हेही वाचा – IND vs SA 2nd T20 : सूर्यकुमार यादवला बाद केल्यानंतर का काढला बूट? सामन्यानंतर तबरेझ शम्सीने केला खुलासा, पाहा VIDEO

रिंकू सिंग सात डावात फक्त एकदाच अपयशी –

रिंकू सिंगच्या चमकदार कामगिरीचा अंदाज यावरून लावता येतो की, तो सातपैकी केवळ एका डावात अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-२० मध्ये तो सहा धावा करून बाद झाला होता. तो चार डावात नाबाद राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे अर्धशतक हे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठरले. त्याने सात डावात १८३.७० च्या स्ट्राईक रेटने २४८ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवानंतर रिंकू सिंगने मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

भारताने पाच वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० सामना गमावला आहे. टीम इंडियाचा शेवटचा पराभव २०१८ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर झाला होता. भारताविरुद्धचा हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १४ डिसेंबरला होणार आहे. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला, तर मालिका हातातून जाईल. २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारताने शेवटची टी-२० मालिका गमावली होती. त्यानंतर २०१८ मध्ये भारताने २-१ असा विजय मिळवला होता.