भारतीय संघाचा नवा फिनिशर म्हणून उदयास येत असलेल्या रिंकू सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिमाखदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान रिंकूने लगावलेल्या एका षटकाराने मैदानातील मीडिया बॉक्सची काचच फुटली.
भारतासाठी खेळताना रिंकूचं हे पहिलंच अर्धशतक आहे. या खेळीदरम्यान रिंकूने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले. यापैकी एक षटकार रोरावत मीडिया बॉक्सच्या दिशेने गेला. काचेचा बॉक्स असल्याने रिंकूच्या तडाख्याने काच फुटली. रिंकूच्या या तडाखेबंद षटकाराने कोणालाही इजा झाली नाही. मीडिया बॉक्समधल्या फुटलेल्या काचेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रिंकूने ३९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची वेगवान खेळी केली. भारताने रिंकूच्या खेळीच्या बळावर १८० धावांची मजल मारली. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य देण्यात आलं. आफ्रिकेने ५ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं.
मूळच्या अलीगढच्या रिंकूने आयपीएल स्पर्धेत खेळताना अशाच स्वरुपाच्या खेळी केल्या आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात रिंकूने सामन्याच्या शेवटच्या षटकात ५ चेंडूत ५ षटकारांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सविरुध्द थरारक विजय मिळवून दिला होता.
सिलिंडर गॅसचे वितरण करणाऱ्या कंपनीत रिंकूचे बाबा काम करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही रिंकूने क्रिकेटची आवड जोपासली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी खेळताना रिंकूने सातत्याने धावा केल्या आहेत.
यावर्षी आयर्लंडविरुध्द डब्लिन येथे रिंकूने भारतासाठी पदार्पण केले.