भारताचा मधल्या फळीतला भरवशाच्या फलंदाज श्रेयस अय्यरची दुखापत बीसीसीआयसह त्याचा आयपीएलमधील संघ केकेआरसाठी देखील डोकेदुखी ठरणार आहे. लवकरच आयपीएल २०२३ ही स्पर्धा सुरू होणार आहे. परंतु त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स संघासमोरील चिंता वाढल्या आहेत. संघाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं आणि मधल्या फळीत संघाची जबाबदारी कोण सांभाळणार? असा सवाल केकेआरच्या प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे. अय्यरविना केकेआरची मधली फळी कमजोर झाली आहे.
फलंदाजाआधी कर्णधार निवडणं हे कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनासमोरचं मोठं आव्हान आहे. आयपीएल २०२३ साठी कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनासमोर कर्णधारपदासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु त्यापैकी अनेकजण असे आहेत ज्यांना फार अनुभव नाही. तर काही खेळाडू भरवशाचे नाहीत. परंतु एक खेळाडू असा आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर नवखा असला तरी त्याच्याकडे केकेआरचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. त्याच्या नावाचे संकेत नुकतेच केकेआरने दिले आहेत. या खेळाडूचं नाव आहे रिंकू सिंह.
५ वर्षात १७ सामने आणि २५१ धावा
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मिळालेल्या संकेतांनुसार रिंकू सिंह हा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. आयपीएल पदार्पणापासून गेल्या पाच वर्षांमध्ये रिंकूला केवळ १७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने २५१ धावा जमवल्या आहेत. आयपीएलचं शेवटचं पर्व त्याच्यासाठी चांगलं ठरलं होतं. गेल्या वर्षी त्याने काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे स्वतः कर्णधार श्रेयस अय्यरनेदेखील कौतुक केलं होतं.
हे ही वाचा >> “तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक, तुम्ही स्वभावाने…” देवेंद्र फडणवीसांच्या वाक्यावर अजितदादांची खळखळून दाद
रिंकूचा डलब रोल पाहायला मिळणार?
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात रिंकू सिंह कोलकात्याकडून खेळाडू आणि कर्णधार अशा दोन्ही भूमिकांमध्ये दिसू शकतो. संघाचं नेतृत्व मिळवण्याच्या शर्यतीत रिंकूसह सुनील नारायण, टीम साऊदी, नितीश राणा, शाकिब अल हसन आणि वेंकटेश अय्यरदेखील आहेत. तसेच अष्यपैलू आणि अनूभवी आंद्रे रसेलकडेदेखील संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.