Rinku Singh keen to join RCB after leaving KKR : रिंकू सिंग आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतो. रिंकू केकेआरसाठी सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. यंदा आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी रिंकू सिंगच्या एका वक्तव्याने सर्वांना चकित केले आहे. वास्तविक, रिंकूने सांगितले की केकेआरने त्याला मेगा ऑक्शनपूर्वी रिलीझ केले, तर त्याला कोणत्या संघात सामील व्हायला आवडेल? यावर उत्तर देताना त्याने जे वक्तव्य केले ते चर्चेत आहे.
रिंकू सिंगला कोणत्या संघात सहभागी व्हायचे आहे?
रिंकू सिंगला या वर्षीच्या आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने रिलीझ केल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील व्हायचे आहे. रिंकूने २०१८ मध्ये केकेआरसाठी खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध सलग पाच षटकार मारून केकेआरला अतिशय अवघड सामना जिंकून देत प्रसिद्धीच्या झोतात आला.
रिंकू सिंगने स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की केकेआरने त्याला रिलीझ केले, तर त्याला आरसीबी संघात जायला का आवडेल? यावर उत्तर देताना रिंकू सिंग म्हणाला, “जर केकेआर संघाने आयपीएल २०२५च्या मेगा ऑक्शनपूर्वी मला रिलीझ केले, तर मला आरसीबी संघात जायला आवडेल. याचे कारण म्हणजे त्या संघात विराट कोहली आहे.” रिंकूच्या या विधानाने केकेआरच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल.
केकेआर रिंकूला रिटेन करणार नाही का?
केकेआर संघाने २०१८ मध्ये रिंकू सिंगला ८० लाख रुपयांना विकत घेतले होते. तेव्हापासून केकेआरने रिंकूला आपल्याकडे कायम ठेवले आहे. त्यानंतर २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये रिंकूची किंमत थोडी कमी झाली आणि केकेआरने त्याला ५५ लाख रुपयांत पुन्हा त्याचा संघात समावेश केला. अशा प्रकारे रिंकू सिंग केकेआरसाठी बराच काळ खेळत आहे. मात्र, यंदा त्यांना केवळ काही मोजकेच खेळाडू रिटेन करता येणार आहे. हे लक्षात घेता केकेआर रिंकूला रिटेन करण्याची शक्यता फार कमी आहे.
रिंकू सिंगची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द –
उल्लेखनीय आहे की रिंकूने आतापर्यंत ४५ आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ४० डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३०.७९ च्या सरासरीने आणि १४३.३४ च्या स्ट्राईक रेटने ८९३ धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने ४ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ६७ आहे.