आक्रमक खेळ हाच सर्वोत्तम बचाव मानला जातो. भारताचा बॉक्सर शिवा थापाच्या यशाचे हेच मुख्य अस्त्र आहे. लंडनमध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या ऑलिम्पिकच्या वेळी तो खूपच नवीन होता. आता मात्र अनुभवाच्या जोरावर रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग या खेळात पदकांची लयलूट करण्यासाठी भरपूर संधी असते. खरेतर प्रत्येक गटात एक खेळाडू प्रतिनिधित्व करणारच, अशी कामगिरी भरपूर लोकसंख्या लाभलेल्या भारताकडून अपेक्षित आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या अभावी यंदा केवळ तीनच बॉक्सर्स ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. शिवाने आशियाई पात्रता फेरीद्वारे ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करणारा यंदाचा पहिला बॉक्सर होण्याचा मान मिळविला. साहजिकच त्याच्यावर देशाची मोठी भिस्त आहे. त्यातच त्याला ऑलिम्पिकचा अनुभव असल्यामुळे त्याच्याकडून अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची अपेक्षा आहे.
शिवा हा गुवाहाटीचा. त्याचे वडील पदम हे कराटेचे मार्गदर्शक, तर मोठा भाऊ गोविंद हा राज्यस्तरीय पदक विजेता बॉक्सर. त्यामुळे शिवाला बॉक्सिंगचे बाळकडू घरातूनच लाभले. माईक टायसन याच्या लढती लहानपणापासून तो पहात असल्यामुळे त्याला लहानपणीच बॉक्सिंची विलक्षण आवड निर्माण झाली. मात्र शिक्षणाचीही त्याला आवड असल्यामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये अव्वल कामगिरी करण्यासाठी त्याला नेहमीच तारेवरची कसरत करावी लागत असे. पहाटे तीन वाजताच त्याची दिनचर्या सुरू होत असे. रशियात २००८ मध्ये झालेल्या आशियाई कुमार स्पर्धेत त्याला कांस्यपदक मिळाले आणि तेथूनच त्याच्या बॉक्सिंगच्या कारकिर्दीला सुरुवात झाली व त्याने मागे पाहिलेच नाही.
शिवाने २०१० मध्ये आशियाई युवा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले व पाठोपाठ त्याने सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत बॅण्टमवेट गटात रुपेरी कामगिरी केली. त्याच्या या रौप्यपदकामुळे त्याच्यावर बक्षिसांचा वर्षांवही झाला. त्यानंतर त्याला काही महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक खेळापासून वंचित राहावे लागले.
२०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकसाठी त्याने पात्रता पूर्ण केली. त्याने पात्रता स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगमध्ये प्रतिनिधित्व करणारा तो सर्वात तरुण भारतीय बॉक्सर होता. या स्पर्धेच्या वेळी तो अवघा अठरा वर्षांचा होता. त्यामुळेच की काय त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. नदीतून अचानक अथांग सागरात आलेल्या छोटय़ाशा माशासारखीच त्याची स्थिती झाली होती. मानसिक दडपणामुळे तो अपयशी ठरला. मात्र या स्पर्धेतील विविध लढतींपासून त्याला भावी कारकिर्दीसाठी मौलिक शिदोरी मिळाली.
लंडन ऑलिम्पिकमधील पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला तरी तो डगमगला नाही. त्याने पुन्हा जिद्दीने पुढची कारकीर्द सुरू ठेवली. २०१३ मध्ये जॉर्डन येथे झालेल्या आशियाई महासंघ अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले.
राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये त्याला पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे तो ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेतही अपयशी होईल अशीच सर्वाची समजूत होती. मात्र त्याने २०१५ मध्ये दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवित सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. पाठोपाठ यंदा चीनमध्ये झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत रौप्यपदक मिळवित ऑलिम्पिकमध्ये पुन्हा सहभागी होण्याची संधी प्राप्त केली. आक्रमक ठोसे मारण्याबाबत शिवा हा खूप ख्यातनाम खेळाडू मानला जातो. प्रतिस्पर्धी खेळाडूला शिताफीने हुलकावणी देत भक्कम बचाव करण्याबाबतही तो माहीर आहे.
शिवा थापाची कामगिरी
- जागतिक अजिंक्यपद स्पर्धा
दोहा (२०१५)-बॅण्टमवेट-कांस्यपदक
- युवा ऑलिम्पिक स्पर्धा
सिंगापूर (२०१०) बॅण्टमेवट-कांस्यपदक
- आशियाई महासंघ अजिंक्यपद स्पर्धा
जॉर्डन (२०१३) बॅण्टमवेट-सुवर्णपदक
milind.dhamdhere@expressindia.com