ज्युदो हा तसा भारतात प्रदीर्घ काळापासून खेळला जाणारा खेळ, परंतु संघटनांच्या अंतर्गत कलहामुळे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. २००४ व २०१२ प्रमाणे यंदाही ऑलिम्पिकमध्ये भारतीय ज्युदोपटूने स्थान मिळवले आहे. त्यामुळे अवतार सिंगचे नाव चर्चिले जाणे साहजिकच आहे. २४ वर्षीय अवतारने रिओ ऑलिम्पिक स्पध्रेची पात्रता मिळवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ९० किलो वजनी गटात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवल्यानंतर दूरध्वनीवरून त्याने पहिल्यांदा आपल्या घरच्यांना ही आनंदवार्ता दिली. त्या वेळी वडिलांनी दिलेली शाबासकी ही अनमोल होती, असे अवतार सांगतो. ‘‘पहिल्यांदा दूरध्वनी केला त्या वेळी ही आनंदाची बातमी सांगितली आणि लगेचच तांत्रिक बिघाडामुळे दूरध्वनी बंद झाला. पुन्हा घरच्या दूरध्वनीवर फोन लावला, त्या वेळी मी बोलण्याआधीच वडिलांनी ‘वाहे गुरू, वाहे गुरू, वाहे गुरू..’ असे देवाचे आभार मानून कौतुक केले,’’ असे अवतार म्हणाला. वडिलांच्या गौरवोद्गाराबद्दल सांगताना तो भावुक झाला हे जाणवत होते.
अक्रम सिंग (६० किलो) यांनी २००४च्या ऑलिम्पिक स्पध्रेची पात्रता मिळवली होती. त्यानंतर पुरुष गटातून ऑलिम्पिकमध्ये खेळणारा अवतार हा पहिलाच खेळाडू. इतर खेळाडूंप्रमाणे अवतारच्या वाटय़ातही आर्थिक चणचणीचा गतिरोधक होताच. त्यामुळे त्याला अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाना मुकावे लागले, मात्र आपल्या मुलाची ओढ लक्षात घेत घरच्यांनी भविष्यासाठी राखून ठेवलेली सर्व बचत त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्ची घातली. टर्की येथे पार पडणाऱ्या स्पध्रेसाठी घरच्यांनी बचत खाते रिकामी केले. ‘‘त्यांनी निश्चित ठेवीत जमा केलेली सर्व रक्कम माझ्यासाठी खर्च केली. ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी होती. ती सर्वच्या सर्व त्यांनी मला दिली. त्यामुळेच मी ऑलिम्पिक पात्रता मिळवल्यानंतर ते अत्यंत भावुक झाले,’’ असे अवतार सांगत होता.
२००८ सालची गोष्ट. स्थानिक प्रशिक्षक अवतारचा इतर खेळाडूंसमोर पाणउतारा करत होते. त्या वेळी अवतारने ज्युदो न खेळण्याचा निर्णय घेतला होता, परंतु घरच्यांनी त्याला सावरले आणि जिद्दीने पुन्हा उभे केले. याबाबत अवतार सांगतो की, ‘‘मी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर वरचढ होत असतानाही प्रशिक्षक त्यांना विजयी घोषित करत होते. त्यांचा माझ्यावर विश्वासच नव्हता. अवतार मोठा खेळाडू बनला, तर तो आपले नाक कापेल, असे ते वारंवार इतरांना सांगायचे. त्या वेळी मी खचून गेलो होतो. मात्र, वडिलांनी आता खेळ सोडायचा नाही, तर खेळायची वेळ आहे, असे सांगून धीर दिला.’’
पंजाबमधील गुरदासपूर जिल्हय़ातील ‘कोठे घुराला’ गावातील अवतारचा जन्म. अवतार लहानपणी घरच्यांसोबत शेतातील कामात हातभार लावायचा. त्याच्या घरच्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि त्यांचा हा विश्वास असाच कायम राखण्यासाठी अवतारने रिओत पदक पटकावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना तो आदर्श मानतो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य अवतारने डोळ्यासमोर ठेवले आहे. ६ फूट ४ इंच उंची असलेल्या या खेळाडूकडून रिओत उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा आहे. आई-वडिलांनी दाखवलेला विश्वास आणि जिंकण्याची जिद्द हेच त्याचे बलस्थान आहे. त्याच जोरावर तो रिओत स्वत:ची छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.
swadesh.ghanekar@expressindia.com