ब्राझीलमध्ये होऊ घातलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताकडून सर्वाधिक खेळाडूंचा चमू सहभागी होणार आहे. त्यात मैदानी म्हणजेच ट्रॅक अँड फिल्डमधील ३६ खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडून पदकाच्या आशाही उंचावल्या आहेत. ‘महाराष्ट्रकन्या’ ललिता बाबर आणि सुधा सिंग यांच्या कामगिरीतील सातत्य पाहता त्या इतिहास घडवतील, तर टिंटू लुका, द्युती चंद, इंदरजित सिंग, विकास गौडा हे युवा व अनुभवी खेळाडूही पदकाच्या शर्यतीत असतील, असे तर्क लावले जात आहेत.
१९८४च्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिक स्पध्रेत पी. टी. उषा यांना काही शतांश सेकंदाच्या फरकाने कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच महिलांची ४०० मीटर अडथळ्याची शर्यत खेळवण्यात आली आणि त्यात भारताकडून पी. टी. उषाने सहभाग घेतला. उपांत्य फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या उषाला ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवल्यामुळे अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मोरॅकोच्या नॅवल एल मौटावाकेल (५४.६१ सेकंद) व अमेरिकेच्या ज्युडी ब्राऊन (५५.२० सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले, तर कांस्यपदक पटकावणऱ्या रोमानियाच्या क्रिस्टिना कोजोकारू ५५.४१ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
भारताकडून मैदानी खेळात ऑलिम्पिकमध्ये नोंदवलेली ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पी. टी. उषा यांच्यानंतर भारताच्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली, परंतु पदकाची पाटी कोरीच राहिली. राजकीय हस्तक्षेप, क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत उदासीनता, अपुऱ्या सुविधा अशी अनेक कारणे यामागे आहेत. आता परिस्थिती सुधारत आहे आणि त्यामुळेच आशादायी चित्राचे स्वप्न रंगवले जात आहे. पण ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंची आणि भारतीयांची तुलना केल्यास आपण अजून किती पिछाडीवर आहोत, याची कल्पना येतेच. एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास ४ बाय ४०० मीटर पुरुष व महिला रिले प्रकारात भारताला सर्वाधिक पदकाची आस आहे. मात्र ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आणि भारतीयांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, हे आव्हान किती खडतर आहे, याचा अंदाज येईल. भारतीय पुरुषांनी ३ मिनिटे ००.९१ सेकंदांत, तर महिलांनी ३ मिनिटे २७.८८ सेकंदांत हे अंतर पूर्ण करून ऑलिम्पिक पात्रता मिळवली. आता ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीवर लक्ष टाकल्यास पुरुष गटात २ मिनिटे ५५.३९ सेकंद, तर महिला गटात ३ मिनिटे १५.१७ सेकंदांची वेळ नोंदवण्यात आली आहे. यावरून आपल्या खेळाडूंमधील सुधारणेला किती वाव आहे, याचे समीक्षण करता येईल. हे अंतिम स्पध्रेतील निकाल आहेत. प्रत्येक प्रकारातील हिटमधील (पात्रता फेरी) वेळेचा किंवा अंतराचा अभ्यास केल्यास अंतिम टप्प्यातही प्रवेश मिळवणे अवघड आहे. मैदानी खेळातील जाणकार आणि दिग्गज खेळाडूही पदकाची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे सांगतात.
‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, २०१६मध्ये अॅथलेटिक्समध्ये पदकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली, याबाबत दुमत नाही, परंतु यामुळे पदक मिळेल असा तर्क लावू शकत नाही. आपण अव्वल दहामध्ये प्रवेश मिळवू, तर काही क्रीडा प्रकारात अव्वल पाचांतही स्थान पटकावू. ललिता बाबर आणि सुधा सिंग यांच्याकडून पदकाच्या धुसर आशा आहेत,’’ असे मत माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केले. या मताशी अनेकांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे तूर्तास अॅथलेटिक्समध्ये आपली ‘दुरून डोंगर साजरे’ अशीच स्थिती आहे.
- ललिता बाबर – ३००० मीटर स्टीपलचेस
- सुधा सिंग ३००० मीटर स्टीपलचेस
मॅरेथॉन
- कविता राऊत मॅरेथॉन
पात्र ठरलेले खेळाडू
- धरमबीर सिंग – २०० मीटर
- मुहम्मद अनास – ४०० मीटर
- जिन्सन जॉन्सन – ८०० मीटर
- मुहम्मद अनास, अय्यासमी धरून, मोहन कुमार, सुमीत कुमार, मोहम्मद कुन्ही, अरोकिया राजीव – ४ बाय ४०० रिले
- थोनाकल गोपी, खेता राम, नितेंदर सिंग रावत – मॅरेथॉन
- बलजिंदर सिंग, गुरमित सिंग, इरफान कोलाथूम थोडी – २० किमी
- संदीप कुमार, मनीष सिंग – ५० किमी
- अंकित शर्मा – लांब उडी
- रंजित महेश्वरी – तिहेरी उडी
- इंदरजित सिंग – गोळाफेक
- द्युती चंद – १०० मीटर
- सरबानी नंदा – २०० मीटर
- निमॅला शेओरन – ४०० मीटर
- टिंटू लुका – ८०० मीटर
- अश्विनी अकुंजी, देबाश्री मजुमदार, जिस्ना मॅथ्यूज, एम. आर. पूवम्मा, निर्मल शेओरन, अनिंल्डा थॉमस – ४ बाय ४०० मीटर रिले
- ओ.पी. जैशा – मॅरेथॉन
- खुशबीर कौर, सपना पुनिया- २० किमी
- मनप्रीत सिंग – गोळाफेक
- सीमा अंतील – थाळीफेकू
swadesh.ghanekar@expressindia.com