ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारतीयांची प्रगती संख्यात्मक वाढीच्या बाबतील उल्लेखनीय आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाने शंभरी पार केली.. इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठय़ा संख्येने भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. पण, प्रश्न हा आहे की यापैकी किती जण या संधीचे सोनं करतील. भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळांमध्ये आपण बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आणि बॉक्सिंग यांना प्रामुख्याने स्थान देण्यास हरकत नाही. या खेळातील प्रगती पाहता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. पण, या पदकांच्या प्रबळ दावेदारांमध्ये बॉक्सिंगची अवस्था ही चिंताजनक आहे. या अवस्थेला लाजिरवाणी म्हणून खेळाडूंच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाही. मात्र, बॉक्सिंगचे प्रशासकीय कामकाज हाकणाऱ्यांनी हेही दिवस दाखवायचे कमी केले नव्हते. शिवा थापा (५६ किलो), विकास कृष्णन (७५ किलो) आणि मनोज कुमार (६४ किलो) या तीन बॉक्सिंगपटूंनाच रिओवारी निश्चित करता आली आहे. हा आकडा प्रशासकीय नाकर्तेपणाचा आरसा आहे. त्यांच्यातील मतभेदामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते आणि त्यामुळेच गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत ही संख्या रोडावलेली आहे. पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावणारी महिला खेळाडू एम. सी. मेरी कोमला रिओ वारी पक्की करण्यात अपयश आले. या अपयशानंतर तिने तमाम भारतीयांची माफी मागितली. त्याचवेळी संघटनांमध्ये चाललेल्या वादांवर मार्मिक टीका करून तिने खेळाडूंच्या पीछेहाटीमागच्या कारणाला वाचा फोडली.
साडे माडे तीन!
अंतर्गत बंडाळ्या मागे सारून भारतीय बॉक्सिंग एका नव्या पारदर्शक पर्वासाठी सज्ज झाले आहे.
Written by स्वदेश घाणेकर
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-07-2016 at 04:13 IST
Web Title: Indian boxer is ready for rio olympics