* साक्षी मलिकचाही उपांत्यपूर्व फेरीत पराभव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, दोघींनाही उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही. विनेश फोगट हिच्या पायाला उपांत्यफेरीच्या लढतीत पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ती सामना पूर्ण करू शकली नाही. अखेर पंचांनी तिची प्रतिस्पर्धी चीनची कुस्तीपटू यानान सन हिला विजयी घोषित केले, तर साक्षी मलिक हिला जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या रशियाच्या कोब्लोवा झोल्बोवा हिच्याविरुद्ध ९-२ अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, स्पर्धेच्या सुरूवातीला विनेश फोगट हिने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात स्विडनच्या जोहाना मॅटसन हिचा, तर साक्षी मलिक हिने ५८ किलो वजनी गटात मोल्डोवाच्या मरिआना चेर्डीवारा हिचा पराभव करून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

“होय, ऑलिम्पिकमध्ये ‘ती’ चूक झाली”, कुस्तीपटू विनेश फोगाटनं मान्य केला WFI चा आरोप!

LIVE UPDATE:

# साक्षी मलिकने सामना ९-२ असा गमावला

# साक्षी मलिकला धक्का, रशियाच्या कोबलोवाने घेतली ५-१ अशी आघाडी.

# थोड्याच वेळात साक्षी मलिकच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला सुरूवात होणार

# विनेश फोगटची दुखापत लवकरात लवकर बरी होईल, अशी आशा.

# विनेश फोगट सामना पूर्ण करून शकणार नाही, पंचांनी चीनच्या सन यनान हिला विजयी घोषित केले.

# विनेश फोगटच्या पायाला झालेली दुखापत गंभीर असल्याचे दिसत आहे, मॅटवर स्ट्रेचर आणण्यात आले.

# अरेरे…चीनच्या सन यानानने घेतलेल्या पकडीमुळे विनेश फोगटच्या पायाला दुखापत.

# विनेश फोगटची चांगली सुरूवात, १-० ने आघाडी.

# विनेश फोगटची लढत चीनच्या सन यानान हिच्याशी

# थोड्याच वेळात विनेश फोगटच्या उपांत्यफेरी सामन्याला सुरूवात

# साक्षी मलिकने सामना ६-५ असा जिंकला

# साक्षी मलिककडून मरिआनाला धोबीपछाड, विनेश फोगटपाठोपाठ साक्षीचाही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

“७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश

# साक्षी मलिकचा सामना मोल्डोवाच्या मरिआना हिच्यासोबत होणार, थोड्याच वेळा सामन्याला सुरूवात

# विनेश फोगटची विजयी सुरूवात, स्विडनच्या जोहाना मॅटसन हिचा ६-० असा पराभव करून विनेश फोगट हिची उपांत्यपूर्व फेरीत धडक

# साक्षी मलिकची दमदार कामगिरी, विजयी सुरूवात. स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live india wrestling vinesh phogat sakshi malik rio 2016 olympics