ब्राझीलच्या रिओ दी जानेरो येथे मराकाना स्टेडियमवर ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. क्रीडा जगतातील या सर्वोच्च स्पर्धेच्या उदघाटनचा अभुतपूर्व उत्साह सोहळा अनुभवण्यासाठी जगभरातील अनेक मान्यवर स्टेडियमवर उपस्थित होते. तब्बल ७५ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात झाली. जगभरातील तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत आपले नशीब आजमवणार आहेत. भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल झाले आहे. भारताचे एकूण ११९ खेळाडू विविध खेळांसाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
उदघाटन सोहळ्यात ब्राझीलची संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. जागतिक तापमानवाढीचे संकट, -हास होत असलेली वनसृष्टी यावर लक्ष केंद्रीत करून उदघाटन सोहळ्यातील सादरीकरण करण्यात आले. मानवी जीवन हे थ्री-डी इफेक्टच्या माध्यमातून दाखविण्यात आले. तसेच ‘सिटी ऑफ बॉक्सेस’ अशीही रिओची ओळख असल्यामुळे लहान-मोठ्या आकाराचे अनेक बॉक्स वापरून त्यावर अतिशय कल्पतेने सादरीकरण करण्यात आळे. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या २०५ देशांच्या खेळाडूंच्या पथकाचे संचलन झाले. भारताकडून नेमबाज अभिनव बिंद्रा याने भारतीय खेळाडूंच्या पथकाचे संचलनात नेतृत्त्व केले. संचलन पार पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच आणि ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष कार्लोस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ऑलिम्पिकचा ध्वज फडकावून स्पर्धेच्या गीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली. अखेरीस ऑलिम्पिकची मानाची ज्योत पेटवून रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात झाल्याची घोषणा करण्यात आली.
उदघाटन सोहळ्याचे अपडेट्स-
[scribble id=”2258135″ type=”event” theme=”32891″]